Top News

सुशिल शेडमाके यांची बिरसा फायटर्सच्या नागपूर जिल्हाध्यक्ष पदी निवड

 सुशिल शेडमाके यांची बिरसा फायटर्सच्या नागपूर जिल्हाध्यक्ष पदी  निवड

 





विदर्भ माझा न्युज 24 - नागपूर



  सुशिल शेडमाके  यांची  बिरसा फायटर्स नागपूर जिल्हाध्यक्ष  पदी निवड करण्यात आली आहे. बिरसा फायटर्सचे संस्थापक राष्ट्रीय  अध्यक्ष सुशिलकुमार पावरा  यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 26/08/2021 रोजी ऑनलाईन सभेत राज्य पदाधिकारी व विदर्भ प्रमुख  यांच्याशी चर्चा करून सुशिल शेडमाके  यांची नागपूर जिल्हाध्यक्ष  पदी निवड करण्यात आली आहे.


   ऑनलाईन, वाॅटसप व फोनद्वारे चर्चेत राज्याच्या मुख्य  पदाधिकारी व विदर्भ पदाधिकारी  यांनी सहभाग नोंदवला.सुरेशकुमार पंधरे विदर्भ प्रमुख यांनी सुशिल शेडमाके यांचे नाव नागपूर  जिल्हाध्यक्ष पदासाठी सुचवले आणि सर्वांच्या सहमतीने सुशिल शेडमाके यांची बिरसा फायटर्स संघटनेच्या   जिल्हाध्यक्ष नागपूर पदी निवड करण्यात आली. सुशिल शेडमाके हे सामाजिक कार्यकर्ते असून सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असतात. संघटनांत सामाजिक कामं करण्याचा दांडगा अनुभव त्यांना आहे.   अनेक सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. त्यांनी बिरसा फायटर्स  संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. 

        बिरसा फायटर्स संघटनेच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या विकासासाठी खूप काही कामे करायची आहेत, युवकांसाठी रोजगार संधी उपलब्ध करून देण्यावर आपण अधिक भर देणार आहोत. अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष नागपूर  बिरसा फायटर्स सुशिल शेडमाके   यांनी व्यक्त केली आहे. 

          सुशिल शेडमाके यांची  बिरसा फायटर्स नागपूर जिल्हाध्यक्ष  पदी निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्याध्यक्ष मनोज पावरा,उपाध्यक्ष राजेश धुर्वे,महासचिव  राजेंद्र पाडवी,महानिरीक्षक केशव पवार, कार्याध्यक्ष नंदलाल पाडवी, राज्य प्रवक्ता रोहित पावरा,कोषाध्यक्ष दादाजी बागूल,हसन तडवी प्रसिद्धी प्रमुख, नाशिक विभाग अध्यक्ष विलास पावरा, धुळे जिल्हाध्यक्ष वसंत पावरा,ठाणे जिल्हाध्यक्ष सतीश जाधव, साहेबराव कोकणी नंदुरबार जिल्हाध्यक्ष, पुणे जिल्हाध्यक्ष कृष्णा भंडारी,संतोष वळवी शहादा तालुका अध्यक्ष,प्रितेश पावरा नाशिक विभाग प्रसिद्ध प्रमुख,गणेश खर्डे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख नंदुरबार,जितेंद्र पावरा युवा जिल्हाध्यक्ष धुळे, राजाभाऊ सरनोबत कोकण विभाग अध्यक्ष  इत्यादी पदाधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. सुरेशकुमार पंधरे  विदर्भ प्रमुख आणि अध्यक्ष बिरसा फायटर्स यांच्या सोबतच विदर्भ पदाधिकारी यांनी सुद्धा विशेष अभिनंदन केले आहे. सुशिल शेडमाके यांची बिरसा फायटर्स नागपूर जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल सगळीकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. शुभेच्छा देणा-या सर्व मित्रांचे सुशिल शेडमाके यांनी आभार मानले आहेत.

Previous Post Next Post