महाराणा प्रताप वार्ड येथे नागरी दलितेत्तर सुधार योजने अंतर्गत ९ कोटी लक्ष ८५ हजार ३६५ रुपयांच्या विकास कामाचे भुमिपुजन संपन्न.
विदर्भ माझा न्युज 24 - बल्लारशाह
बल्लारशाह शहरात विकासपुरुष माजी अर्थ नियोजण व वनमंत्री लोक लेखा समिती सदस्य आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या अथक प्रयत्नातुन अनेक विकास कामांच्या माध्यमातुन बल्लारशाह शहराचा चेहरा मोहरा बदललेला आहे.
त्याच कडीचा एक भाग दि.१३ सप्टेंबर २०२१ ला महाराणा प्रताप वॉर्ड,बल्लारशाह येथे श्रीमती इंदिरा सेंगर ते बापूराव वैद्य,व शंकर बुद्धार्थी ते श्रीमती आशा अनमदवार यांच्या घरा पर्यंत सी.सी.रोड व नालीचे बांधकाम कामांचे भुमिपुजन वनविकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदनसींह चंदेल यांच्या हस्ते व नगराध्यक्ष हरीश शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितत पार पडले.
सदर कार्यक्रमात न.प चे बांधकाम अभियंता बोढे, संगीडवार, तानाजी वैद्य, राकेश बुरडकर, रवी माणेकर,विकास शेडमाके,डाॅ.आस्कर,काळे गुरुजी,वैद्य काका, मानेकर,कंटीवार, मत्ते,जामनिक, धांडे , सुर्यवंशी, काकडे, महेशकर, रासुरवार, रवींद्र मडावी, दिलीप चौहान,आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

