Top News

त्या भ्याड हल्याचा बल्लारशाह नगर‌ परीषदेच्या कर्मचार्यांनी केला निषेध.

 अनिधकृत फेरीवाल्याचा पालिका सहाय्यक आयुक्तांवर चाकूने हल्ला, हाताची 3 बोटं छाटली



विदर्भ माझा न्युज 24 - बल्लारशाह 



 अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या माजिवडा विभागाच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंगळे  यांच्यावर भाजी विक्रेत्याने जीवघेणा हल्ला  केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या भाजी विक्रेत्याने पिंगळे यांच्यावर धारदार चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात पिंगळे या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्या हाताची तीन बोटे तुटली  आहे. तसेच त्यांच्या डोक्याला देखील गंभीर दुखापत झाली आहे. ही घटना सोमवार दि.30 ला सायंकाळी साडेसहाच्या  सुमारास घडली

अमरजीत यादव  (वय-45) असे हल्लेखोराचे नाव आहे. फेरीवाल्याच्या या हल्ल्यात रक्तबंबाळ झालेल्या कल्पिता इंगेळे यांना

तातडीने ठाण्यातील वेदांत रुग्णालयात  दाखल करण्यात आले. परंतु त्यांना गंभीर दुखापत झाल्याचे लक्षात येताच त्यांना तातडीने ज्युपिटर रुग्णालयात  हलवण्यात आले. पिंगळे यांच्यावर हल्ला होत असल्याचे लक्षात येताच त्यांच्या अंगरक्षकाने  त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपीने त्यांच्यावरही हल्ला करुन गंभीर जखमी केले.

ठाण्यातील कासारवडवली येथील मुख्य जंक्शनवर अनधिकृत फेरीवाल्यांचा सुळसुळाट आहे. त्याविरोधात पालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंगळे यांनी मोहीम हाती घेतली होती.या फेरीवाल्यांना हटवण्यासाठी गेलेल्या पिंगळे यांच्यावर आरोपीने आपल्या हातातील धारदार चाकूने अचानक हल्ला केला.या हल्ल्यानंतर आरोपी अमरजीत यादव याला पोलिसांनी तात्काळ बेड्या ठोकल्या आहेत.तसेच त्याच्याजवळ असलेला कोयता देखील जप्त केला आहे.धक्कादायक म्हणजे, 3 वर्षापूर्वी याच अमरजित यादवर हल्ल्याचा गुन्हा दाखल झाला होता.


त्या भ्याड हल्याचा  बल्लारशाह नगर‌ परीषदेच्या कर्मचार्यांनी केला निषेध 


आपले कर्तव्य बजावित असतांना एका महिला अधिकार्यावर अशा प्रकारचा हल्ला होणे ही अत्यंत चिंताजनक बाब असल्यामुळे नगर परिषद,बल्लारशाह मधील सर्व संवर्ग कर्मचारी व‌ सर्व नगर परीषद कर्मचारी यांचे यांच्या वतीने झालेल्या हल्ल्या बाबद जाहीर‌ निषेध करून या प्रकरणी अटक केलेल्या गुन्हेगारांनवर शिघ्र गतीने कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा होण्याबाबद न.प.बल्लारशाह चे मुख्याधीकारी विजय सरनाईक यांना पत्र देऊन दिनांक 31/8/2021 ला काम बंद आंदोलन  करण्यात आले.   


मुख्याधीकारी विजय सरनाईक यांनी प्राप्त झालेल्या संघटनेच्या  पत्रानुसार  गुन्हेगारी प्रवृतीचे लोक जेव्हा कर्तव्य बजावत असतांना अधिकार्यांनवर हल्ले करतात तेव्हा अश्या प्रकारचा भ्याड हल्लाने केवळ हल्ला झालेला अधीकारीच न्हवे तर संपुर्ण प्रशासनाचे मनोधेर्य खच्ची होते. त्या मुळे अशा प्रकारच्या हल्ल्याचा संघटीत निषेध करणे व‌ हल्लेखोरांवर कठोर कारवाई करणे बाबद चे पत्र  उपवीभागीय  अधीकारी दिप्ती  सुर्यवंशी / पाटील यांना दिले  व  1 दिवस काम बंद ठेऊन झालेल्या कृत्ताचा जाहीर निषेध केला.

Previous Post Next Post