स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मीती सह अनेक मागण्यांना घेऊन २६ ऑगस्टला बल्लारशाह विराआंस तर्फे बामनी टी पाॅइंट येथे रास्ता रोको आंदोलन - रोहीत लोनारे, शहर अध्यक्ष विराआंस,युवा आघाडी.
विदर्भ माझा न्युज 24 - बल्लारशाह
दि. २२ ऑगस्ट २०२१ ला बल्लारशाह शासकीय विश्राम ग्रुह येथे विदर्भ राज्य आंदोलन समिती ची बैठक पार पडली,
विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष,उतकृष्ट सांसद पटु,शेतकरी तथा विदर्भवादी नेते माजी आमदार ऍड.वामनराव चटप पुर्व विदर्भ अध्यक्ष कपील इदे यांच्या प्रमुख उपस्थीतीत बल्लारशाह येथील शासकीय विश्राम ग्रुहात बल्लारशाह पदाधीकार्यांची बैठक घेण्यात आली,
बैठकित येत्या २६ ऑगस्ट २०२१ ला बल्लारशाह आल्लापली मार्गावरील बामनी टी पाॅईंट येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचे आदेश समितीचे नेते वामनराव चटप यांनी दीले,
आंदोलनातील प्रमुख मागण्या
१) विदर्भाचे स्वातंत्र्य राज्य केंद्र सरकारने तात्काळ निर्माण करावे.
२) कोरोणा काळातील सर्व विज बील राज्य सरकारने माफ करावे २०० युनीट पर्यंत मोफत विज द्यावी व २०१ युनीट नंतरचे विजबील निम्मे करावे.
३) शेतीपंपाचे थकीत वीज तात्काळ माफ करावे.
४) केंद्र सरकारने पेट्रोल, डिझल व स्वयंपाकाचे गॅस ची दरवाढ तात्काळ मागे घ्यावी.
५) साप चावून मरणार्या व्यक्तीस इतर नागरीकांन प्रमाणे तात्काळ मदत देण्यात यावी.
६) वनहक्क कारद्यात मालकी पट्टे देताना गैर आदीवासी साठी लागू असलेली ३ पिढयांची अट तात्काळ रद्द करण्यात यावी.
२६ ऑगस्ट २०२१ ला विदर्भवादींनी तसेच नागरीकांनी जास्तीत जास्त संखेत आंदोलनात सहभागी होऊन स्वतंत्र विदर्भ राज्याची मागनी आणखी तिव्र करावी असे आव्हान विराआंस युवा आघाडी तालुका अध्यक्ष पराग गुंडेवार,तालुका उपाध्यक्ष संजय घुगलोत,तालुका सचिव गौतम कांबळे,शहर अध्यक्ष रोहीत लोनारे,शहर सचिव संदिप केशकर,रोहन दुपारे यांनी केले.
