Top News

सर्व सामान्य जनतेच्या मदतीला धाऊन जानारा नेता काळाच्या पळद्याआळ.

सर्व सामान्य जनतेच्या मदतीला धाऊन जानारा नेता काळाच्या पळद्याआळ.


राजू गुंडेटी यांच्या निधनाने सर्वसामान्य जनतेच्या मदतीला धावून जाणारा कार्यकर्ता हरपला : आ. सुधीर मुनगंटीवार




विदर्भ माझा न्युज 24 - बल्लारशाह

भाजपाचे बल्लारशाह येथील नेते श्री राजू गुंडेटी यांच्या निधनाने सर्वसामान्य जनतेच्या मदतीला धावून जाणारा कार्यकर्ता हरपल्याची शोकभावना माजी अर्थमंत्री तथा बल्लारशाह विधानसभेचे आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.

भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या साठी ही बातमी धक्कादायक आहे.पक्षाच्या प्रत्येक चळवळीत,मोहिमेत ,आंदोलनात ते सक्रिय असायचे . सर्वसामान्य जनतेच्या मदतीला तत्परतेने धावून जाणे हा त्यांचा स्थायीभाव होता. कोरोना काळात त्यांनी गोरगरीबांच्या मदतीसाठी घेतलेला पुढाकार वाखाणण्याजोगा होता. 

त्यांच्या निधनाने भाजपा परिवाराची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरणयाचे बळ परमेश्वर देवो व गताम्यास शांती प्रदान करो अशी शोकभावना आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.

स्व. राजु अण्णा गुंडेट्टी यांची अंतिम यात्रा आज दि.१६/८/२०२१ रोज सोमवार ला सुभाष चौक,महाराणा प्रताप वार्ड राहत्या घरून १२:३० वा निघणार आहे. 


Previous Post Next Post