Top News

जगुया थोडंसं माणुसकीसाठी फाऊंडेशन ने वृक्षांना ‌राखी बांधुन रक्षाबंधन केले साजरे तर जनतेला दिला अनोखा संदेश...

जगुया थोडंसं माणुसकीसाठी फाऊंडेशन ने वृक्षांना ‌राखी बांधुन रक्षाबंधन केले साजरे तर जनतेला दिला अनोखा संदेश...



विदर्भ माझा न्युज 24 - चांदागड (चंद्रपूर)

 जगुया थोडंसं माणुसकीसाठी फाऊंडेशन मित्र परिवार तर्फे दिनांक 22 ऑगस्ट रविवार ला रक्षाबंधन निमित्त चंद्रपुर वहरा पासुन ‌अवघ्या काही अंतरावर असलेल्या जुनोना गावातील जंगलामध्ये रुक्षाचे रक्षन व्हावे या साठी सर्व जगुया थोडंसं माणुसकीसाठी फाऊंडेशनचे मित्र परिवार तर्फे झाडाला राखी बांधून रक्षाबंधन साजरे करण्यात आले,



 ज्या प्रमाणे एक बहीण आपल्या भावाकडून माझी रक्षा कर जीवनभर म्हणून अपेक्षा करते तसेच आज वृक्ष सुद्धा  ही अपेक्षा आपल्याकडून करत आहे तरी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी जंगल असणे मोठया प्रमाणात गरजेचे आहे आपल्या सर्वांना माहिती आहे,


 चंद्रपूर जिल्हा हा मोठ्या प्रमाणात औद्योगीक त्याच बरोबर प्रदूषित जिल्हा म्हणून ओळखला जातो जर आपल्याला यां प्रदूषणावर मात करायचे असेल तर मोठया प्रमाणात वृक्ष लागवड करणे गरजेचे आहे माणुस जन्मापासुन ते मरेपर्यंत रुक्षाच्या संपर्कामध्ये येत असतो माणूस किती वृक्ष लावतो आणि त्याचे किती संवर्धन करतो हा देखील विचार करायला लावणारा  प्रश्न आहे


म्हणून सर्वांने पर्यावरणाचा रक्षन करण्यासाठी प्रत्येकाने झाडें लावा झाडें जगवा असे आव्हान जगुया थोडंसं माणुसकीसाठी फाऊंडेशन चे कार्तिक बल्लावार, सुरज बीटे, सुशांत धकाते,राजु कुळे, अशपाक शेख, महेश सिंह, आरती वैरागडे,रिया बीटे, श्रावणी वैरागडे,गंधर्व बीटे यांनी केले आहे.

Previous Post Next Post