चंद्रपुर विठ्ठल मंदीर वार्डतील युवकाचा अमलनाला बांध मधील पाण्यात बुडुन मृत्यु
विदर्भ माझा न्युज 24 - गडचांदूर
सद्या पावसाळ्याचे दिवस सुरु आहे अश्यात गेल्या गेल्या काही दिवसापूर्वी आलेल्या मोठ्या पावसामुळे अमलनाला बांध पाण्याने पूर्ण पणे भरून ओव्हरफ्लो झाले आहे.
ओव्हरफ्लो पाहण्याकरिता चंद्रपूर जिल्ह्यातून दररोज शेकडो पर्यटक दृष्य बघन्यास येत आहेत.त्या मुळे अमलनाला परिसरात दिवसेंन दिवस पर्यटकांची वाढती संख्या बघता नागरीकांच्या सुरक्षेकरिता पोलिस बंदोबस्त ही लावण्यात आले होते.
आज तर रविवारची सुट्टीचा दिवस असल्यामुळे असंख्य पर्यटक अमलनाला येथे फिरायला व पहायला आले होते.आज दुपारी ३:३०/ ४:०० वाजताच्या सुमारास एका व्यक्तीचे ओव्हरफ्लोच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची माहिती आहे.
सुत्रांनकळुन मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार चंद्रपूर येथील काही मित्र नातेवाईकांसह अमलनाला येथे पाण्याचा आनंद लुटण्यासाठी आले असता अचानक दोन लहान मुले पाण्यात बुडाल्याची आरडाओरड सुरू झाली. त्यांना वाचवण्याकरिता अनेक जण यांच्या कडे धाव घेतली असता,चंद्रपूर येथील एका युवकाने ही त्यांना वाचवण्याकरीता पाण्यात उतरला मात्र पाणी खोल असल्यामुळे तो खोल पाण्यात बुडाल्याची माहिती मिळाली आहे.
मृतक युवकाचे नाव गोलू चट्टे वय २४ रा. विठ्ठल मंदिर वॉर्ड, चंद्रपूर असे आहे. लोकांच्या सहाय्याने त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहचुन पंचनाम्याची कारवाई सुरू केले आहे.



