महाराष्ट्राचा सुप्रसिद्ध पहेलवान सखाहरी बर्डे यांची बिरसा फायटर्स महाराष्ट्र राज्य सहसचिव पदी निवड
विदर्भ माझा न्युज 24 - रत्नागिरी
शरीरसौष्ठव स्पर्धेत 40 पेक्षा अधिक पदके व प्रमाणपत्रे मिळविलेल्या राहूरी येथील सखाहरी शांताराम बर्डे या बाॅडी बिल्डरची बिरसा फायटर्स महाराष्ट्र राज्य सहसचिव पदी निवड करण्यात आली आहे. बिरसा फायटर्सचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 21/07/2021 रोजी ऑनलाईन सभेत राज्य पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून पहेलवान सखाहरी बर्डे यांची बिरसा फायटर्स महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीत वर्णी लागली आहे. ऑनलाईन, वाॅटसप व फोनद्वारे चर्चेत राज्याच्या मुख्य पदाधिकारी यांनी सहभाग नोंदवला व सर्वांनी सखाहरी शांताराम बर्डे यांना राज्य कार्यकारिणीत घेण्याचे ठरवले.यापूर्वीच सखाहरी बर्डे यांनी बिरसा फायटर्स संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे आता बिरसा फायटर्स मध्ये वकील, आर्मी नंतर बाॅडी बिल्डर सुद्धा काम करायला आल्यामुळे बिरसा फायटर्स टिम व संघटना अधिकच मजबूत झाली आहे.
सखाहरी शांताराम बर्डे या आदिवासी तरूणाने शरीरसौष्ठव स्पर्धेत 40 पेक्षा अधिक पदके व प्रमाणपत्रे मिळवली आहेत. त्याचबरोबर कला शाखेत उच्च शिक्षण घेतले आहे. सखाहरी बर्डे हा एक मेहनती,होतकरू तरूण पहेलवान आहे.गरीब परिस्थितीवर मात करत त्याचा जीवनात संघर्ष सुरू आहे. बिरसा फायटर्स टिमचे काम आवडल्यामुळे त्यांनी बिरसा फायटर्स मध्ये येण्याचा निर्णय घेतला आहे. बिरसा फायटर्स संघटनेच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या विकासासाठी खूप काही कामे करायची आहेत,अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित सहसचिव सखाहरी बर्डे यांनी व्यक्त केली आहे.
पहेलवान सखाहरी बर्डे यांची महाराष्ट्र राज्य सहसचिव पदी निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्याध्यक्ष मनोज पावरा,उपाध्यक्ष राजेश धुर्वे,महासचिव राजेंद्र पाडवी,महानिरीक्षक केशव पवार, कार्याध्यक्ष नंदलाल पाडवी, राज्य प्रवक्ता रोहित पावरा,कोषाध्यक्ष दादाजी बागूल,हसन तडवी प्रसिद्धी प्रमुख, नाशिक विभाग अध्यक्ष विलास पावरा, धुळे जिल्हाध्यक्ष वसंत पावरा,ठाणे जिल्हाध्यक्ष सतीश जाधव, साहेबराव कोकणी नंदुरबार जिल्हाध्यक्ष, पुणे जिल्हाध्यक्ष कृष्णा भंडारी,संतोष वळवी शहादा तालुका अध्यक्ष,प्रितेश पावरा नाशिक विभाग प्रसिद्ध प्रमुख,गणेश खर्डे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख नंदुरबार,जितेंद्र पावरा युवा जिल्हाध्यक्ष धुळे इत्यादी पदाधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.पहेलवान सखाहरी बर्डे यांची राज्य सहसचिव पदी निवड झाल्याबद्दल सगळीकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. शुभेच्छा देणा-या सर्व मित्रांचे सखाहरी बर्डे यांनी आभार मानले आहेत.
