बल्लारशाह कील्ल्याचे बुरुज ढासळले...
प्रशासनाने वेळीच लक्ष दिले असते तर आज ही वेळ आली नसती...
अनेक विकास कामे झाली मात्र आमदार साहेबांना शहराच इतीहास आठवला नाही
बल्लारशाह विधानसभेच्या आमदारांच्या दुर्लशते मुळे शहराचे इतीहास पुसण्याच्या मार्गावर..
विदर्भ माझा न्युज 24 - बल्लारशाह
खांडक्या बल्लाळशाह राजे यांनी १३व्या शतकात स्थापन केले ल्या बल्लारशाह शहरातील बल्लाळशाह राजे यांचा कील्ला ढासळला..
सविस्तर वृत्त असे आहे की, विश्वपराक्रमी महराजा खांडक्या बल्लाळशाह राजे यांनी १३ व्या शतकात बांधलेला बल्लारशाह शहराच वैभव असलेले कील्ले बल्लारशाह चे अने अवशेष प्रशासनाच्या दुर्लश्यते मुळे ठासळले आहे, कील्लाच भरपुर प्रमानात नुकसान प्रशासणाच्या नजर अंदाज केल्याने झाले आहे, विकसांच्या नावावर आवश्यक नसलेली कामे विधानसभेत मुनगंटीवार यांनी केली आहे मात्र कील्या कडे व समाधी कडे बल्लारशाह विधानसभेच्या आमदरांनी कधीच लक्ष दिले नाही या गोष्टीची खंत वाटते.
गेल्या दोन दिवसांन पासुन जिल्हात मुसळधार पावसाला सुरवात झाली आहे, अनेक नाले,तलाव,नद्या भरून पानी दोन्ही तळावर तुळंब वाहत आहे, शेतकर्यांचे पुकांचे देखीलअनेक ठीकानी नुकसान झाले आहे,
तर या सतत सुरू असलेल्या पावसामुळे कील्लाचे बुरुज ढासळले आहे, सुदैवाने यात कुणाला हानी झालि नाही, मात्र बुरुज ढासळल्याने कील्ल्याला लागुन असलेल्या एका घराची दिवाल तुटली अहे तर बहमनी साम्राज्य,मुघल,मराठे,इंग्रज,निजाम, अश्या अनेक सैन्यांनशी झुंज देणार्या बल्लाळशाह गडाचे मात्र बुरुज ढासळले आहे, ज्या कील्लानी अनेक शत्रु चे वार परतावून लावले ल्या ज्या गोंड सामराज्याला नैस्तनाबुत करने कधी कुनाला साधले नाही त्या कील्यचा उरलेल्या अवषेशा पैकी एक बुरुज आज ढासळले या गोष्टीची खंत वाटते यात चुक फक्त आती फक्त प्रशासनाची आहे, गेल्या अनेक वर्षांन पासुन बल्लारशाह विधानसभेतुन निवडुण आलेल्या आमदार सुधीर मुनगंटीवार यांची चुक आहे, आमदार साहेबांनी बल्लारशाह शहराच वैभव शहराच इतीहास जोपासण्यासाठी कधीच प्रयत्न केले नाही.
पुरातनखात्या कळे बल्लाळशाह राजे यांचे कील्ले व समाधी स्थळाची नोंदच नाही आहे, आता तरी आमदार साहेबांनी, प्रशासणानी दोळे उघळावे व कील्या कडे आणी गोंडराजेंच्या समधी कडे लक्ष द्यावे अशी मागनी आता इतीहास प्रेमी करीत आहे.
मुख्याधीकारी विजय सनाईक यांची प्रतीक्रीया
बल्लाळशाह कील्याच्या बुरुज ढसळला यावर मुख्याधीकारी यांची विदर्भ माझा न्युज 24 ने प्रतीक्रीया घेतली असता
बुजुर ढासळल्याची माहीती पुरातनविभागाला दिली आहे ते त्याची योग्य डागडुजी करतील अस विजय सरणाईक यांचे म्हने आहे तर पुरातन खात्या कळे नोंद नसल्याच त्यांना सांगीतल्यावर मुख्याधीकारी यांनी तातपुरता बुरुजाची डागडुजी करण्यास पुरातनविभागाला सांगीतल्याचे म्हटले आहे, तर बुरुज ढासळल्याने ज्या घराची भिंत तुटली आहे त्यांचे नगरपरीषदचे इंजिनीयर व नायब तहसीलदार हे पाहनी करतील मग प्रशासन योग्य ती मदत करेल असेही मुख्याधीकारी यांनी म्हटले आहे.






