Top News

विदर्भ वेगळा होणारच व तो आम्ही घेतल्याशिवाय थांबणार नाही - राम नेवले

 

हिंगणा तालूका कार्यकर्ता बैठकीत राम नेवले यांचे प्रतिपादन


विदर्भ वेगळा होणारच व तो आम्ही घेतल्याशिवाय थांबणार नाही - राम नेवले




विदर्भ माझा ‌न्युज 24 - नागपूर 

स्वतंत्र विदर्भ राज्य हा आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे. विदर्भाची लढाई फार जुनी आहे. विदर्भाची लढाई आता अंतीम टप्प्यात आली असून विदर्भ राज्य वेगळा होणारच आहे व तो आम्ही घेतल्याशिवाय थांबणार नाही ज्या भाजपाने आम्हाला विदर्भ राज्य देण्याचे आश्‍वासन दिले होते त्याच केंद्र शासनाकडून आम्ही विदर्भ राज्य घेणार आहोत व ते त्यांना द्यावेच लागेल. अन्यथा विदर्भातून जावे लागेल. त्यासाठी 9 ऑगस्टच्या नागपूर येथे होत असलेल्या विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या बेमुदत ठिय्या आंदोलनाला आपण हजारोंच्या संख्येत सामील व्हा असे प्रतिपादन विदर्भ आंदोलनाचे नेते राम नेवले यांनी हिंगणा तालूका विदर्भवादी कार्यकर्त्यांच्या बैठकीत केले.

दि. 18 जुलैला सायंकाळी 5 वा. हिंगणा तालूका विदर्भवादी कार्यकर्त्यांची सभा महाजनवाडी, वानाडोंगरी, हिंगणा येथे झाली. त्या सभेत राम नेवले प्रमुख वक्ता म्हणून बोलत होते. विदर्भाच्या शोषणातून महाराष्ट्राचा विकास उभा झाला आहे, विदर्भातील 70 टक्के वीज उत्पादनातून मुंबई-पुणे-नाशिक-ठाणे या परिसरातील 24 तास विजेचा झगमगाट झाला असून सर्व कारखाने, प्रकल्प तिकडे स्थापीत होऊन सर्व रोजगार पश्‍चिम महाराष्ट्रात तयार करण्याचे षडयंत्र पश्‍चिम महाराष्ट्राच्या नेत्यांनी रचले. विदर्भ मात्र गरीबी, दारीद्री, बेरोजगार, शेतकरी आत्महत्या, नक्षलवाद, लोडशेडींग या प्रश्‍नांनी ग्रसीत झाला असून  हे सर्व समस्या पश्‍चिम महाराष्ट्र वाद्यांनी तय्यार केला असून विदर्भाचे पद्धतशीर शोषण केले. परंतु आम्हाला दुःख याचे आहे की विदर्भातील जनप्रतिनिधी यांनी कधिच विदर्भाच्या शोषणाचा प्रतिकार केला नाही. फक्त खुर्ची सांभाळून माया कशी जमविता येईल यातच ते मस्त होते. आता हे शोषण थांबविण्यासाठी विदर्भातील जनतेनेच रस्त्यावर आले पाहीजे असे आवाहन राम नेवले यांनी केले.

युवा आघाडीचे प्रदेश अध्यक्ष मुकेश मासुरकर यांनी भाषणात सांगीतले की, विदर्भ राज्याची लढाई जिंकायची असेल तर विदर्भातील युवकांनी समोर येऊन तुमच्या रोजगारासाठी, विदर्भाच्या विकासासाठी, शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी लढाईत सामील होऊन हे विदर्भ आंदोलन मोठे केले पाहीजे.

नागपूर जिल्हा उपाध्यक्ष गुलाबराव धांडे, नागपूर शहर दक्षिण-पश्‍चिम अध्यक्ष सचिन लोणकर यांचे ही भाषण झाले. अजय सिरसवार यांनी सभेचे आयोजन केले होते व प्रास्ताविक ही त्यांनीच केले.

बैठकीला अ‍ॅड. मनिषा खोंडे, संदिप खंडारे, सुधीर कडू, कमलेश सिंह, बट्टु हिरणवार, प्रमोद मलेवार, दिपक नासरे, रमेश निमजे, अजय सिरसवार, शुभम चौधरी, प्रकाश दवंडे, सौ. प्राची गजानन केदार, हंसादास शेंदरे, नंदु पोटे, अरविंद मदनकर, निलेश भुरसे, प्रतीक चरभे, सचिन डाखळे, भवानी शर्मा, अजित शाह उपस्थित होते. हिंगणा तालूक्यातील 200 च्या वर विदर्भवादी कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होणार हे ठरले.

Previous Post Next Post