त्या हत्ये चे सर्व आरोपी बल्लारशाह पोलीसांच्या ताब्यात..
विदर्भ माझा न्युज 24 - बल्लारशाह
बल्लारशाह शहरात हत्येचे सत्र सुरूच असतांना गुरुवार दिनांक 29 जुलै 2021 ला सायंकाळी 5:00 / 6:00 वाजताच्या दरम्यान मारोती उर्फ विक्की शंकर काकडे वय - ३४ रा.कन्नमवार वॉर्ड बल्लारशाह व वेकोलीत कामगार असलेले यांची बल्लारशाह - सास्ती पुलावर हत्या झाल्याची घटना घडली होती या घटनेची माहिती मिळताच बल्लारशाह पोलीस घटनास्थळी दाखल झाले व सदर घटनेचे वृत्त कळताच बल्लारशाह शहर पुन्हा एका हत्येने हादरले पोलिसांनी या प्रकरणात आपली तपासचक्र वेगाने फिरवीले आणी अवघ्या 2 दिवसात या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात बल्लारशाह पोलिसांना यश मिळविले आहे.
विशेष बाब म्हणजे सदर हत्या प्रकरण अवैध प्रेमसंबंधातून झाल्याची विशेष सूत्रांची माहिती आहे, या प्रकरणात एकूण 4 आरोपींना अटक करण्यात आली असून आरोपींची नावे १) सौ. प्राजक्ता उर्फ राणी मारोती काकडे, वय-२५ मृतकाची पत्नी, रा.कन्नमवार वॉर्ड, बल्लारशाह, २)कांता देवानंद भसाखेत्रे वय-४१, मृतकाची सासू रा.पंचशील वॉर्ड घुटकाळा चंद्रपूर, ३) संजय मारोती टिकले वय-२५ रा.संजय मारोती टिकले वय-२५ वर्ष, व्यवसाय - ट्रकचालक रा.नकोडा घुग्गुस जि. चंद्रपूर (मुख्य आरोपी असून) ४) विकास भास्कर नगराळे वय-२३ व्यवसाय-मजुरी रा.नकोडा घुग्गुस जि. चंद्रपूर असे ४ आरोपींना काल रात्रीच्या सुमारास बल्लारशाह पोलीसांनी अटक केली आहे,
या संबंधातील अधिक माहितीनुसार मुख्य आरोपी व मृतकाची पत्नी यांचे अवैध प्रेमसंबंध असल्याची माहिती सुत्रांकडुन प्राप्त झाली आहे मुख्य आरोपी व त्याचा सहकार्यांनी बल्लारशाह येथे येवून दारू पिण्याच्या बहाण्याने त्यांना बाहेर घेऊन गेले व घुग्गुस नकोडा येथील एसीसी नाल्याच्या जवळ पाण्यात बुडवून व गळा घोटून हत्या केल्याची सूत्रांची माहीती आहे, तसेच त्या ठिकाणी हत्या करून त्यांचे प्रेत प्लास्टिक बोरीतुन चारचाकी वाहनाने बल्लारशाह येथे आणून बल्लारशाह-सास्ती पुलावर टाकल्याचे वृत्त आहे,
मृतकाच्या गळ्यावर ब्लेडने वार करून हत्या केल्याचे बनावट चित्र निर्माण केले आहे.
विशेष म्हणजे सदर प्रकरण अवैध प्रेमसंबंध व वेकोली कामगारांच्या मृत्यूनंतर अनुकम्पा तत्वावर नौकरी हस्तगत करण्याच्या प्रयत्नातून सदर प्रकरण घडल्याचे वृत्त आहे या प्रकरणाचा पुढील तपास उमेश पाटील पोलीस निरीक्षक बल्लारशाह यांच्या मार्गदर्शना खाली सहायक पोलिस निरीक्षक विकास गायकवाड,सहायक पोलिस निरीक्षक शलेंद्र ठाकरे बल्लारशाह करीत असून सदर प्रकरणातील सर्व आरोपींना न्यायालयात पेशी करण्यात आल्याची सुत्रांची माहीती आहे.



