राजुरा तालुक्यातील विरूर स्टेशन रोडला पर्यटकांनी एकदा नक्की भेट द्यावी.
विरूर स्टेशन ग्रामपंचायतीचे गावातील रस्त्याकडे दुर्लक्ष.
इन्सानियात अशोशियशन ग्रुप तर्फे जन जागृतीच्या पाट्या लाऊन रस्त्यासाठी अनोखं आंदोलन.
( विदर्भ माझा न्युज 24 - उपजिल्हा प्रतीनीधी) धनपालसिंग वधावन, विरुर स्टेशन :-
राजूरा तालुक्यात विरूर स्टेशन येथील बस्टाप ते गावात आणि आठवडी बाजारा कड़े जण्याच्या मार्गाचे सुंदर असे दृश्य पाहायला मिळत आहे, की ज्याची कल्पना नाही कुनी करू शकत नाही आणि हे दृश्य फक्त विरुर स्टेशन चे गावकारीच पाहू शकतात विरुर स्टेशन ग्राम पंचायत हे खराब रस्ते पाहुशकत नाही.
विरुर स्टेशन गावातील रस्ता खुप खराब अवस्ते मध्ये असुन त्यावर दुचाकी वाहन तर सोडा पायदड चालने सुद्धा खुप कठिन झाले आहे,
आणि या पावसाड्यात रोड दुरुस्ती करण्या एवजी त्या रोड वरती मुरम टाकून पुन्हा खराब केला आहे.
नागरिकांना येण्याजान्या करिता भरपुर त्रास सहन करावा लागत आहे.
किती तरी दू चाकी घसरून रोड लगताच्या नालित पडत असून ग्रामपंचायतीचे याकडे कुठलेच लक्ष नाही
तरी याची वारंवार तक्रार ग्राम पंचायत मध्ये करुण सुद्धा या रोडचि काहीच सुधारणा करण्यात आली नाही.
त्या करिता इंसानियत अशोशियशन ग्रुप तर्फे जन जागृतीच्या पाट्या लाऊन रस्त्यासाठी अनोखं आंदोलन करण्यात आले
आणि त्यात शिवसैनिक सुधाकर मोरे,तुषार मोरे,स्वप्नील भोस्कर,गुलाब देठे, विक्की बिस्वास,किट्टी कम्मलवार सहभागी झाले.








