Top News

Navyuwak_Ganesh_Utsav_Mandal_and_Vidarbha_State_Andolan_Samiti_Umred_jointly_organized_a_tree_planting_program_on_the_occasion_of_Agriculture_Day

 नवयुवक गणेश उत्सव मंडळ व विदर्भ राज्य आंदोलन समिती उमरेड यांच्या संयुक्त विद्यमाने कृषीदिना निमित्ताने वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न




विदर्भ माझा न्युज 24 - उमरेड

नवयुवक गणेश उत्सव मंडळ व विदर्भ राज्य आंदोलन समिती उमरेड यांच्या संयुक्त विद्यमाने कृषीदिना निमित्ताने वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रम बुधवारी पेठ मधिल गोटेखणी या परिसरात घेण्यात आला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित श्री. मंगेश गिरडकर व श्री. प्रकाश धकाते होते. या कार्यक्रमात संचालन सागर सोनकुसरे अध्यक्ष विराआस उमरेड शहर यांनी केले.

श्री. मंगेश गिरडकर यांनी त्यांच्या मार्गदर्शनात त्यांनी सांगितले की कोरोणा चा काळात आॅक्सिजन विकत घ्यावे लागत होते . आता वृक्ष लावुन आॅक्सिजन वाढविण्यासाठी युवकांनी सामोर येऊन असेच कार्य सुरू ठेवावे. "झाडे लावा झाडे जगवा आणि आॅक्सिजन वाढवा" असा संदेश त्यांनी दिला.कार्यक्रमा चा शेवटी आभार आशिष खवास यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमात गुणवंत बानकर, अमित भुसारी,लकी सोनकुसरे, प्रफुल भुसारी, आयुष सोनकुसरे,प्रणय सोनकुसरे यांचे सहकार्य लाभले.

Previous Post Next Post