Top News

Is_the_game_being_played_with_the_patient's_life_in_Chandrapur_District_General_Hospital?

 चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांच्या जीवाशी खेळ खेळला जात आहे का? 


रुग्णालयातच स्वच्छाता नाही मग रुग्ण निरोगी व‌ स्वस्थ कसा होईल - अमर धोंगडे (भिम आर्मी शहर अध्यक्ष,बल्लारशाह)



विदर्भ माझा न्युज 24 - चांदागड (चंद्रपूर)

सध्या कोरोना मुळे संपूर्ण जग हादर्लेल आहे अश्यात आता पावसाळ्याला‌ सुरवात झाली आहे,पावसाळ्यात डेंगु,मलेरीया,डाईरीया सारखे विकार साहजिकच आहे त्यामुळे योग्य काळजी घेण्यासाठी आपला परीसर,नाली,सौचालय,बाथरूम स्वच्छ ठेवने‌ व‌ वेळो वेळी फीनाईल मारणे जेने करून डास,माशी येनार नाही घान वास येनार नाही या करीता या उपाय योजना आपन करतोच,

मात्र जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपुर येथील वार्ड क्र.8 पुरुष वार्ड मधील सौचालय - बाथरूम अत्यंत दयनीय अवस्थेत आहे,बातरूम आणी सौचालय परीसरात घानीचे साम्राज्य व ‌दुर्गंध आहे  रुग्णालयात रुग्ण उपचार घेवून बर व्हायला येतो पन इथली अवस्था बघता रुग्ण कदापी बरा होईल यांची अपेक्षा करने ही चुकिचेच आहे?. चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णाच्या जीवाशी खेळ खेळला जात आहे का? असा प्रशन पडत आहे.

        सबंधीत प्रशासनाने सौचालय व बाथरूम च्या सफाई कड़े लक्ष द्यावे व रुग्नाच्या जीवाशी जो खेळ खेळला जात आहे तो त्वरित थांबवावा. रुग्नांचे काहि बर वाइट झाल्यास ऑन डिवटी अधिकारी,कर्मचारी व रुग्णालयाशी सब्न्तधित प्रशाशन जबाबदार असणार का?


असा आरोप भिम आर्मी चे शहर अध्यक्ष अमर धोंगडे यांनी केला आहे, अमर धोंगडे हे स्वता मागील काही दिवसांपासुन जिल्हा सामान्य रुग्नालयात उपचारा साठी भरती झाले आहे, त्यावेळेस त्यांना हा प्रकार दिसुन आला असल्याच विदर्भ माझा न्युज 24 सोबत बोलतांना ते म्हनाले....

Previous Post Next Post