वर्धा राज्य उत्पादन शुल्क अधीक्षकां तर्फे नागरिकांना आव्हान.
अवैध दारु विक्रीची माहिती असल्यास टोल फ्री क्रमांकावर किंवा ऑनलाईन तक्रार नोंदवावी.
विदर्भ माझा न्युज 24 - वर्धा
जिल्हयातील नागरिकांना आपल्या परिसरात होत असलेल्या अवैध, भेसळयुक्त व बनावट दारु विक्रीची माहिती असल्यास त्यांनी ऑनलाईन तक्रार नोंदवावी. यासाठी गुगल फॉर्मवर https://forms.gle/6ozwfU5u76zah2eG6 या लिंक वर तसेच राज्य स्तरावरील 18008333333 या टोल फ्री क्रमांकावर, 8422001133 या व्हॉट्सॲप क्रमांकावर किंवा अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाच्या 07152-240163 या दूरध्वनी क्रमांकावर तक्रार नोंदवावी असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक सागर धामोरकर यांनी केले आहे.
