Top News

मुल येथे शिवसेनेच्या वर्धापनदिनानीमीत्य ‘एक हाथ मदतीचा’ या उपक्रमा अंतर्गत विविध समाजपयोगी उपक्रम - नितीन येरोजवार,मुल तालुका प्रमुख.

मुल येथे शिवसेनेच्या वर्धापनदिनानीमीत्य  ‘एक हाथ मदतीचा’ या उपक्रमा अंतर्गत विविध समाजपयोगी उपक्रम - नितीन येरोजवार,मुल तालुका प्रमुख.



(विदर्भ माझा न्युज 24 - तालुका प्रतिनिधी)संदिप तेलंग,मुल :- 

शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त्य मुल तालुका शिवसेनेच्या वतीने   ‘एक हाथ मदतीचा’ या उपक्रमा अंतर्गत विविध समाजपयोगी उपक्रम जिल्हाप्रमुख संदिप गिर्हे यांच्या मार्गदर्शनात मुल शिवसेना तालुका प्रमुख नितीन येरोजवार यांनी स्वखर्चाने राबविले आहे. या प्रसंगी कोविड-१९ बाबत जनजागृती मास्क व सॅनीटायझर चे वाटप करण्यात आले. त्या नंतर कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या विधवांना फॅशन डिझायनिंग  प्रशिक्षणाची जबाबदारी घेऊन  शिलाई मशिनचे वाटप करण्यात आले. कोरोनामुळे बाधित होऊन  मृत्यू झालेल्या कुटुंबप्रमुखाच्या अचानक  संकट येऊन ठेपले त्या गरजु  कुटुंबातील विधवांना मशिनचे शिवसेना तालुकाप्रमुख नितीन येरोजवार यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. 

सदर उपक्रमांतर्गत गरजु शेतकरीवर्ग  यांना बियाणांचे वाटप करण्यात आले याप्रसंगी उपतालुका प्रमुख रवि शेरकी, सत्यनारायण अमरूदिवार,  सुशी दाबगाव सरपंच अनिल सोनुले, सुनिल काळे , राहुल महाजनवार,संदिप निकुरे, निखिल भोयर, अरविंद करपे,शिन्नु कन्नुरवार विनोद काळबांधे हजर होते

Previous Post Next Post