WCL ने दत्तक घेतल्या हिरापुर गाँवाचा वारसा फक्त नावालाच....
रसत्या दुरुस्ती करण्याची मागणी करून सुद्धा कोणतीही शासकीय निधि उपलब्ध झाली नाही ....
नागरिकांनी लोकवर्गणी व श्रमदानातून केली पांदण रसत्याची दूरूस्ती....
( विदर्भ माझा न्युज 24 - तालुका प्रतिनीधी ) मनोज श्रिहरी गोरे,राजुरा :-
राजुरा व कोरपना तालुक्याच्या सिमेवर असलेले हिरापुर या गाँवामध्ये गेले अनेक वर्षापासून पांदण रसत्याची दुरुस्ती करण्याची मागणी करून सुद्धा कोणतीही शासकीय निधि उपलब्ध न झाल्यामुळे अखेर गाँवातील नागरिकांनी लोकवर्गणी व श्रमदानातून पांदण रसत्याची समस्या दूर केली ।
हिरापुर या गाँवाला काही वर्षापूर्वीच (wcl)डब्लू.सी.एल ने दत्तक घेतले असून सुद्धा हा वारसा फक्त नावालाच आहे अजूनही कोणती मदत ही गाँवाला मिळालेली नाही । मदतीची वाट पाहत निराश झालेल्या गावकर्यांनी शेवटी श्रमदानातून पांदण रस्ता दुरुस्ती साठी गाँवचे माजी पो.पा. श्री. दादाजी पा. गोरे, श्री. मनोज गोरे (अध्यक्ष , शा.व्य.स),श्री सुधाकर पा गोरे, श्री श्रीहरी गोरे,श्री मधुकर गोरे, श्री. वसंता बोबडे,श्री. पंढरी लोहे, श्री संजय गोरे,
श्री दिलीप गोरे, श्री. बळीराम गोरे, श्री पुंडलिक गोरे,श्री प्रभाकर गोरे, श्री ज्ञानेश्वर गोरे,श्री सूरज गोहोकर, प्रविण गोरे, स्मितिल गोरे, स्वप्निल गोरे, आकाश लोहे,रक्षक लोहे, अनिकेत पारखी,हर्षल गोरे आदी गावकर्यांनी पुढाकार घेत गावाचा रस्ता दुस्त केला।
कीत्तेक वर्षा पासुन येजा करण्या करीता नागरीकांना अडचनीचा सामना करावा लागत होता मात्र शासनाने व गावाला दत्तक घेतलेल्या (WCL)डब्लू.सी.एल ने कुठलीच मदत केलेली नाही, शेकटी हताश झादेल्या गावकर्यांना लोकवर्गणी व श्रमदानातून पांदण रसत्याची समस्या दूर करावी लागली !



