येत्या काही तासात 'यास चक्रीवादळ' भयंकर रुप धारण करणार
विदर्भ माझा न्युज 24 - नवी दिल्ली :-
भारतीय हवामान विभागानं व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, येत्या १२ तासांत यास चक्रीवादळ धोकादायक रुप धारण करू शकतं.
पूर्व - मध्य बंगालच्या खाडीवरून चक्रीवादळ यास गेल्या सहा तासांत जवळपास ९ किलोमीटर प्रती तासाच्या वेगानं उत्तर - वायव्य दिशेनं पुढे सरकताना आढळलं. येत्या १२ तासांत हे वादळ भयंकर रुप धारण करण्याची शक्यता आहे. २६ मे रोजी सकाळपर्यंत उत्तर ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या तटांना हे वादळ धडक देण्याची शक्यता आहे.


