कोरोना लसीकरण केंद्र विरूर स्टेशन येथे सुरु
भाजप शाखा विरूर स्टेशन ची मागणी जिल्हाधीकारीने केली मंजुर ।।
( विदर्भ माझा न्युज 24 - उपजिल्हा प्रतीनीधी ) चांदागड (चंद्रपुर), धनपालसिंग वधावन :-
मागील महिण्यापासुन राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव ख़ुब वाढला आहे.गावोगावी कोरोनाची लागण झालेली आहे.अशातच कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी लसीकरण अभियान राबविण्यात येत आहे.प्राथमिक आरोग्य केंद्र चिंचोली (बु.) येथे मागील दोन महिण्यापासुन लस दिली जात आहे.परंतु विरूर स्टे. व इतर 10 गावातील लोकांना लस पासुन वंचित राहावे लागत असल्याने करिता विरूर स्टे येथे तातडीने कोविड लसीकरण ची मागणी संजयभाऊ धोटे तर्फे सुधीरभाऊ यांना मागणी केली होती.सदर विरूर लसीकरण केंद्राला जिल्हाधीकारीने मान्यता देत दि.16-5-21रोज रविवार ला 45 वर्षावरिल पहिली व दुसरी लस देण्यात येणार आहे. लसीकरण केंद्र स्थळ-जिल्हा परिषद शाळा विरूर येथे देण्यात येणार आहे.
