Top News

वरोरा शहरात झाले आणखी एक हत्या...अंबादेवी वार्ड येथील महादेव मंदिर जवळ सट्टा व्यावसायीकाची केली हत्या...

 वरोरा शहरात झाले आणखी एक हत्या...अंबादेवी वार्ड येथील महादेव मंदिर जवळ सट्टा व्यावसायीकाची केली हत्या...


 दोन दिवसाच्या अंतरात ही दुसरी हत्या असून अवैध धंदे याचे मूळ कारण असल्याचे दिसत आहे.



( विदर्भ माझा न्युज 24 - उपजिल्हा प्रतीनीधी ) चांदागड (चंद्रपुर), धनपालसिंग वधावन :-  

  दोन दिवसांपूर्वी वरोरा शहरातील गांधी चौकात भर दिवसा निलेश ढोक नावाच्या मुलाने एका 26 वर्षीय अलाम नावाच्या मुलाचा खून केला होता त्याचा तपास सद्या सुरू असतांनाच आता चक्क दुसरा खून झाल्याने वरोरा शहरात शांतता सुव्यवस्था बिघडली असल्याने नागरिक भयभीत झाले असल्याचे चित्र दीसते आहे.

आज दिनांक 15 मे ला सायंकाळी 7.15 च्या सुमारास दोन ते तीन अज्ञात इसमानी अंबादेवी वार्ड येथील महादेव मंदिर जवळ असलेल्या झोपडीत साजिद शेख नावाच्या तरुणाची गोळ्या झाडून हत्या केली असल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे.

मृतक साजिद शेख हा आझाद वार्डातील रहीवाशी असून तो अगोदर सट्टा चालवीत होता व आता गांजा(Weed) चा व्येवसाय करत होता, तो एकटां असल्याच्या फायदा घेत दोन ते तीन आरोपींनी त्याच्यावर सहा राऊंड माऊजर ने दोन गोळ्या झाडल्या त्यापैकी एक छातीत तर दुसरी कानाखाली मारली विशेष म्हणजे आरोपींनी आपले शस्त्र (बंदूक ) डेड बॉडी जवळ ठेवून पोबारा केला. आरोपी हे तोंडाला फडके बांधून असल्याने त्यांचा शोध आता पोलीस कशा प्रकारे घेणार यावर सर्व अवलंबून आहे.

Previous Post Next Post