नागपुरात धाड...अनिल देशमुखांच्या निकटवर्तीय कुटुंबाच्या बंगल्यावरही ईडीचे छापे..
विदर्भ माझा न्युज 24 - नागपुर :-
नागपुरात आज तीन ठिकाणी ईडीने छापे मारले. ईडीच्या अधिकार्यांकडून नागपुरातील सदर परिसरात न्यू कॉलनी भागांमध्ये एका बंगल्यांमध्येही चौकशी सुरु आहे, अशी माहिती आहे.
समित आइजेक यांच्या बंगल्यावर धाड
सदर परिसरात न्यू कॉलनी भागातील आइजेक कुटुंबियांचा हा बंगला असून समित आइजेक हे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जवळचे मानले जातात. मिळालेल्या माहिती प्रमाणे आज सकाळी साडेसात वाजता ईडीचे तीन अधिकारी न्यू कॉलनी परिसरात आइजेक कुटुंबियांच्या बंगल्यामध्ये दाखल झाले आणि तेव्हापासून आतापर्यंत अधिकारी आतमध्ये असून ईडीकडून ही चौकशी सुरु असल्याची माहिती आहे.
व्यावसायिक सागर भटेवार यांच्या घरावर धाड
नागपुरातील व्यावसायिक सागर भटेवार यांच्या घरावर आज ईडीने धाड टाकली. एका मोठ्या नेत्याशी व्यायसायिक संबंध असल्यामुळे रेड पडल्याची माहिती आहे. सकाळी सात वाजता भटेवार यांच्या शिवाजीनगर परिसरातील घरी ईडीची रेड पडली. साधारण चार तास ईडीच्या अधिकाऱ्यांनी सागर भटेवार यांची चौकशी केली. त्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी काही कागदपत्र आणि इलेक्ट्रॅानीक गॅजेट जप्त केल्याची माहिती आहे. सकाळी 7 ते 11 ही रेड चाचली.
याशिवाय, नागपुरातील जाफर नगर परिसरातही एका ठिकाणी ईडी अधिकाऱ्यांकडून चौकशी केली जात असल्याची माहिती आहे.
