Top News

विरुर पोलीस स्टेशन तर्फे आशधाम हॉस्पिटल ला कोविडऑक्सीजन करिता 75,500 रूपयाचे निधि वितरण

 विरुर पोलीस स्टेशन तर्फे आशधाम हॉस्पिटल ला कोविडऑक्सीजन करिता 75,500 रूपयाचे निधि वितरण....



( विदर्भ माझा न्युज 24 - चांदागड (चंद्रपुर)उपजिल्हा प्रतीनीधी )  धनपालसिंग वधावन,राजुरा :-

राजुरा तलुक्यातील विरुर स्टेशन येथील आशधाम हॉस्पिटल मध्ये मागील आठवड्यात  कोविड रुग्नांनकरिता आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते ऑक्सीजन सुविधा सुरु करण्यात आली आणि आज दिनांक21.05.2021रोजी विरुर पोलीस स्टेशन येथील पोलीस निरीक्षक तिवारी  व सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी ही निधि जमा करुण राजुरा चे उपविभागीय पोलीस अधीकारी नायक यांच्या उपस्थितीत व गावाचे सरपंच भाग्यश्री,कांग्रेस चे कार्यकर्ते अजय रेड्डी , आक्केवार आणि विरुर गुरुद्वारा कमेटिचे अध्यक्ष सरदार बवेजा  यांच्या हस्ते सोपविन्यात आले.

विरुर पोलिस स्टेशन चे ठानेदार तिवारी,  पोलीस उपनिरीक्षक वडतकर आणि कर्मचारी पो.हवा.दिवाकर पवार,सुनील राऊत, मल्लेश नारगेवार,वगदरकर,देवाजी टेकाम,कुडसंगे,नागराडे,कुमारे,pc विजय मुंडे,प्रमोद मिलमिले,विजय तलांडे,प्रल्हाद जाधव,मडावी,काडे, भगवान मुंडे,अतुल सहारे,राहुल सहारे,दिनेश गरमडे, स्वप्निल चांदेकर,रामदास निल्लेवार,प्रवीण काम्बड़े,खंडाडे या सर्व कर्मचाऱ्यांचे गावकर्यांनी  मनःपूर्वक आभार प्रकट केले.

Previous Post Next Post