बल्लारशाह पोलीसांनी तब्बल 38,60,000 रू कींमतीचा मूद्दे माल केला जप्त.
( विदर्भ माझा न्युज 24 ) बल्लारशाह :- आज दि. 05/05/2021 रोजी बल्लारशाह पोलीस ठाणे अंतर्गत गुप्त माहीती वरून डी.बी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमिझ मुलाणी व सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास गायकवाड व पोहवा सुनील कामतकर, पोना मनोज पिदुरकर, पोशि श्रीनिवास वाबिटकर, पोशि शेखर माथनकर व पोशि दिलीप अदे यानी नविन बसस्टॉप समोरील रोड वर नाकाबंदी करून प्रोव्ही. रेड केली त्यामध्ये खालीलप्रमाणे माल जप्त करण्यात आला आहे.
1) आं.कि. 18,60,000/- रु. की चे 124 खरडयाचे बॉक्समध्ये देशी दारु रॉकेट सन्त्रा च्या 12,400 बॉटल मिळुन आल्या
2) आं.कि 20,00, 000/- कि.ची कथ्या रंगाची टाटा कंपनी ची 12 चक्का ट्रक असा एकूण 38,60,000/- रु.कि माल मिळुन आला आहे.
आरोपीची नावे -1) प्रशांत भानुदास दाराला 2) शेख अशपाक शेख अजीम.
पाहिजे असलेल्या आरोपीचे नावे 1) प्रदीप दारला 2) करण निषाद सर्व रा. भगतसिंग वार्ड, बल्लारशाह जि. चांदा(चंद्रपुर)
सदरचा माल, वाहन व आरोपी यांना पोलिस ठाणे येथे आणुन पो.स्टे अप क्र. 512/2021 मदाका कलम 65(अ) 83 प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे.

