धानापूर येथील श्री रासबिहारी कॉटन इंडस्ट्रीजला लागली आग.
कोट्यवधी रुपयांचे नुकसान.
(विदर्भ माझा न्यूज 24 - प्रतिनिधी) निकेश बोरकुटे गोंडपिपरी :- तालुक्यातील धानापूर गावालगत असलेल्या श्री रासबिहारी कॉटन इंडस्ट्रीजला आज दुपारी आग लागल्याची घटना घडली. आगीत बराच कापूस जळून खाक झाल्याने मालकाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. आग लागली असताना तिथे मजूर काम करीत होते.अचानक आग लागल्याने उपस्थित असलेल्या मजुरांची तारांबळ उडाली.आग विझविण्यासाठी अग्निशामक दलाला आमंत्रित केले. कॉटन इंडस्ट्रीजला आग कशी लागली हे अद्याप कळू शकले नाही. प्राथमिक माहितीनुसार आगीत करोडो रुपयांचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. सदर कॉटन इंडस्ट्रीज ही प्रेमलता गोनपल्लीवार आणि आनंदीदेवी सारडा यांच्या मालकीचे आहे.
