Top News

वनविभाग किनवट अंतर्गत निचपुर बिट येथील निकृष्ट चैनलींकींग पोल कंपाउंड कामाची तात्काळ चाैकशी करा - लक्ष्मीकांत मुंडे

 वनविभाग किनवट अंतर्गत निचपुर बिट येथील निकृष्ट चैनलींकींग पोल कंपाउंड कामाची तात्काळ चाैकशी करा - लक्ष्मीकांत मुंडे





(विदर्भ माझा न्युज 24) माहुर :- एकीकडे जंगल नष्ट होण्याच्या मार्गावर असताना देशपातळीवर सरकार जंगलाच्या संरक्षणासाठी व जोपासनेसाठी कोट्यावधी रुपये खर्च करत असताना तेहतीस कोटी वृक्ष लागवडी सारख्या योजनेत भ्रष्टाचार होतो आणि आज सरकार त्याची चाैकशी लावतय ही शोकांतीकाच म्हणावी लागेल अशातच सरकारी तिजोरीतुन किनवट वनविभागा अंतर्गत येणा-या निचपुर बिट च्या जंगलात चैनलींकींग चे पोलने जाळी बसविण्याचे काम चालु असुन ते अत्यंत निकृष्ट व बोगस होत असल्याच दिसुन आल्याने किनवट येथील इलेक्ट्राॅनीक मिडीया प्रेस क्लब चे अध्यक्ष तथा भाजपा चित्रपट कामगार आघाडीचे नांदेड जिल्हाध्यक्ष व मराठवाडा प्रभारी असणारे लक्ष्मीकांत मुंडे यांनी एका अर्जाद्वारे उपविभागीय अधीकारी कार्यालयात सदरील कामच्या चाैकशीची मागणी केली आहे.


  सदरील कामात रेतीचा वापर न करता चुरीचा वापर करुन थातुर मातुर असे पोल रोवल्या जात आहेत जे साध्या हवने कोसळुन पडतायत काम हे अजिबात निविदेनुसार होत नसल्याने सदरील कामाची चाैकशी वा पंचनामा हा त्यांच्या समोर व आॅन कॅमेरा व्हावी असेही त्यांनी तक्रार अर्जात नमुद केले आहे जर काम योग्य असेल तर ते स्वता नुकसान भरपाई देणार व जर बोगस व निकृष्ट असेल तर संबधीत कामाचे देयके तर थांबवावितच परंतु त्या काॅन्ट्रॅक्टर व त्याच्या कामाकडे दुर्लक्ष करत असेल्या वनविभागाच्या कर्मचारी वर्गावर ही कार्यवाही करण्याची मागणी केली आहे अन्यथा उपोषण करू  असा इशारा लक्ष्मीकांत मुंडे यांनी  वन विभागाला दिला आहे.


Previous Post Next Post