विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या लढ्याला यश.
महाराष्ट्र शासनाचा निर्णय कृषी व घरगुती विज कनेक्शन कापण्यास स्थगिती..
(विदर्भ माझा न्युज 24 - उपसंपादक)गौतम कांबळे,नागपुर :-कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रातील जनता हतबल झालेली आहे.अनेक दिवस गरीब जनता ही कोरोनाच्या महामारीमुळे त्रस्त होती त्यामुळे हातचे काम गेल्याने गरीब जनते समोर फार मोठे संकट आलेलं होते.आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने कस बस काम करून जनता आपल्या पोटाची भूक भागवत आहेत.
अशातच उर्जामंत्री नितीन राऊत यांच्या आदेशाने महावितरण कंपनीने वीज ग्राहकांना कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवुन राज्यातील जनतेला अंधारात टाकण्याचे पाप केले आहे. राज्यातील संवेदनाहीन महावीकास आघाडीने नागरिकांच्या जिवनाचा छळ चालविला आहे. लॉकडाऊनच्या काळात गरिब जनतेला अवा जवी रकमेची बिले पाठवुन आता त्यांचे कनेक्शन कापण्याचा पाप राज्य सरकारने केलेला आहे.
म्हणून महावीकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ संपूर्ण विदर्भात वीदर्भ राज्य आंदोलन समीती तर्फे महावितरण विभाग कार्यालय तसेच महावितरण कंपनीच्या विरोधात सतत विजबिला ची होळी करून,महावीतरण कार्यालयाला ताला ठोको आंदोलन करण्यात आले होते.
इतकेच नाही तर राजधानी नागपुर ला उर्जामंत्री नितीन राऊत यांच्या घरावर ४ जानेववारीला तबल ५ ते ७ हजार विदर्भवाद्यांनी संवीधान चौक ते रेशीम बाग पायदळ मार्च काढला,या वेळी पोलीसांनी आंदोलन करत्यांनवर लाढी चार्ज करून आंदोलनाचे नेते वामनराव चटप,राम नेवले,रंजना मामर्डे, मुकेश मालुलकर,सह ५० विदर्भवांद्यांना अटक करून त्यांचा वर गंभीर स्वरूपाची खोटी गुन्हे दाखल केली व आंदोलन दळपन्याचा प्रयत्न केला मात्र विराआंस इथेच थांबली नाही तर महावीतरण ने जनतेची कापलेली विज कनेक्षन जोडुन देण्याची मोहीमच विराआंस ने हाती घेतली व शेवटी महाराष्ट्र शासन नरमल ह्याच विदर्भात केलेल्या विदर्भ राज्य आंदोलन समीतीच्या लढ्याला मात्र आता काही प्रमानात यश प्राप्त झाले आहे, महाराष्ट्र शासनाने निर्णय घेऊन कृषी व घरगुती विज कनेक्शन कापण्यास मात्र आता स्थगिती दिलेली आहे.
