Top News

शिक्षकाना पूर्ण वेतन नाही तर पालक कडून पूर्ण फिस कशासाठी :- राजु झोडे

शिक्षकाना पूर्ण वेतन नाही तर पालक कडून पूर्ण फिस कशासाठी :- राजु झोडे


खाजगी शाळेतील शैक्षणिक फी माफीसाठी वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन.



  (विदर्भ माझा न्युज 24)बल्लारपुर :-  कोरोना महामारीमुळे सन 2020 -21 मध्ये सर्व खाजगी शाळा बंद आहेत ‌. कोरोना काळात सर्वसामान्य जनतेची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने खाजगी शाळेची फी भरणे सर्वसामान्य पालक वर्गाला अवघड जात आहे. त्यातच खाजगी शाळेच्या माध्यमातून विद्यार्थी व पालकांना जबरदस्तीने फी भरण्याकरिता सांगितले जात आहे. शैक्षणिक फी भरली नाही तर परीक्षेला बसू देणार नाही अशी तंबी शाळेकडून  दिली जात आहे. ही बाब अतिशय गंभीर असून या सत्रातील संपूर्ण शैक्षणिक ती माफ करण्यात यावी याकरिता वंचित बहुजन आघाडीचे नेते राजू झोडे यांच्या नेतृत्वात बल्लारपूर आत तीव्र आंदोलन करण्यात आले.

       


   खाजगी शाळांची फी माफ करण्यात यावी करिता वंचित बहुजन आघाडी च्या वतीने तहसील कार्यालयासमोर जोरदार नारेबाजी करण्यात आली. आंदोलनादरम्यान राजू झोडे यांनी शाळेच्या मनमानी कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त करून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे असे सांगितले. तसेच तात्काळ शाळेची फी माफ करण्याकरिता प्रशासनाने पाऊल उचलावे अन्यथा येणाऱ्या काळात वंचित बहुजन आघाडी द्वारा याहीपेक्षा तीव्र आंदोलन करून प्रशासनाची व खाजगी शालेय व्यवस्थापनाची झोप उडवणार असा इशारा वंचित बहुजन आघाडी द्वारे देण्यात आला.

       बल्लारपूर तहसील कार्यालयासमोर आंदोलन करताना वंचित बहुजन आघाडीचे नेते राजू झोडे , संपत कोरडे,प्रशांत झामरे,महेश माकोडे,संदेश करवाडे, सचिन पावडे, नरेंद्र सोनारकर,छोटू साठे,वंदना तामगाडगे,दिनेश वाळके, विवेक साठे, स्वप्नील सोनटक्के, दिनेश भगत, दुरेश तेलंग, डी एन खैरे, रवी वनकर,शीला शेट्टी,नितीन घरडे,विनोद लोणकर, फिरोज खान,प्रदीप झामरे, हरमित सिंग, रशीद सलीम सय्यद, सचिन थिपे, ओम रायपुरे,भगीरथ वाकडे, राममनोहर पटेल, सोही लेनगुरें, स्वाती सुखदेव, रुपाली सोनारकर,जगदीश बोढाले, कृष्ण मूर्ती रामटेके, रेखा कोरे,लता लेनगुरें प्रणय मडावी, स्मिता ढेंगळे तथा वंचित बहुजन आघाडीचे अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.



Previous Post Next Post