दोन थेंब जीवनाचे.
पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ!
पोलिओ डोज टाळू नका- समाधान जाधव.
(विदर्भ माझा न्युज 24 - उपसंपादक)गौतम कांबळे,वाई गाव,ता.माहुर.जि.नांदेड :- शून्य ते पाच वयोगटातील बाळांसाठी पोलिओ लसीकरण मोहिमेचा आज (ता.३१) रोजी सकाळी आठ वाजता प्राथमिक आरोग्य केंद्र वाई बाजार येथे जिल्हा परिषद सदस्य समाधान जाधव यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.या वेळी ते बोलत होते.
यावेळी बोलताना समाधान जाधव यांनी लसीकरण करणे हे बालकांसाठी अतिशय महत्त्वाचे असून संसर्गाच्या काळामध्ये त्याची निकड अधिक स्पष्ट झाली आहे.त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये बालकांचे लसीकरण टाळू नका असे आवाहन माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य समाधान जाधव यांनी केले.या वेळी पंचायत समितीचे उपसभापती उमेश जाधव,उपसरपंच हाजी उस्मान खान,तालुका आरोग्य अधिकारी एस.बी.भिसे,नवीद खान,पत्रकार साजीद खान,कैलास बेहेरे,वाई बाजार आरोग्य केंद्राचे डॉ.श्रीनिवास हुलसुरे,डॉ.स्वप्नील राठोड,डॉ.सपना इंगोले यांच्यासह आरोग्य कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.पुढे बोलताना जाधव म्हणाले की,आज रविवारला आपल्या जवळच्या बुथवर अंगणवाडी,शाळा,आपले आरोग्य उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र,सर्व रुग्णालय, बसस्टँड,या सर्व ठिकाणी जाऊन आपल्या शून्य ते पाच वयोगटातील बाळांना पोलियोचा डोस आवश्य पाजून घ्या,बाळ नुकतेच जन्मलेले असेल तरीही,या पूर्वी डोस दिला असेल तरीही,बाळ आजारी असेल तरी (वैद्यकीय अधिकारी यांच्या सल्ल्याने द्यावा) कारण दोन थेंब पोलिओचे बाळाला आयुष्य लाभेल मोलाचे असे ते म्हणाले.लसीकरणाचे शुभारंभ धन्वंतरी चे पूजन करून जिल्हा परिषद सदस्य समाधान जाधव व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बाळांना पोलिओचा डोज पाजून करण्यात आले.
वाई बाजार:प्राथमिक आरोग्य केंद्रात पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करत बाळाला पोलिओ डोस पाजताना जिल्हा परिषद सदस्य समाधान जाधव व इतर.
