टीम इंडियाला मोठा धक्का.
(विदर्भ माझा न्युज 24 - उपसंपादक)गौतम कांबळे :- IND Vs ENG: इंग्लंडविरोधात सुरु असलेल्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियानं आघाडी घेतली आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या तिसर्या कसोटी सामन्यात भारताने दुसर्या दिवशी इंग्लंडचा 10 गडी राखून पराभव केला आहे. या विजयासह भारताने चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. आता आयसीसीवर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं तिकिट मिळवण्यासाठी चौथा सामना जिंकण किंवा अनिर्णित ठेवणं भारतीय संघाला आवश्यक आहे. या महत्वाच्या सामन्यात संघाचा आघाडीचा गोलंदाज जसप्रीत बुमराह मात्र संघात नसणार आहे.
चौथ्या कसोटीआधी टीम इंडियाला बुमराह खेळणार नसल्यानं मोठा धक्का बसला आहे. जसप्रीत बुमराहनं खाजगी कारणांमुळं शेवटच्या कसोटीत खेळणार नसल्याचं सांगितलं आहे. त्यामुळं त्याला संघातून रिलिज करण्यात आलं आहे. त्याच्या संघाबाहेर जाण्याविषयी अधिक माहिती मिळालेली नाही. मात्र एएनआयच्या रिपोर्टनुसार बुमराहनं खाजगी कारणामुळं शेवटच्या कसोटीत न खेळण्याबाबत विनंती केली होती, जी मंजूर करण्यात आली आहे.
