राजेंचा ऐकेरी उलेख करून अपमानीत करणार्या रवि फलटनकर वर त्वरीत गुन्हा दाखल करा - पराग गुंडेवार ( तालुका अध्यक्ष विराआंस युवा आघाडी).
बल्लारशाह पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांनच्या कडे लेखी तक्रारीतुन विराआंस युवा आघाडीची मागनी.
(विदर्भ माझा न्युज 24 - संपादक)संजय घुगलोत,बल्लारशाह,जि.चांदा :- अनेक वर्षांपासून ऐतिहासिक शुरविर, दैवत व यांचा निगळीत असलेल्या काही गोष्टी ज्यांच्या पासुन कोणत्या समाजाची किंवा कोणत्या व्यक्ती ची भावना दुखावण्याचा काम कोणी ना कोणी समाज कंटक करतच असतो.
विदर्भ पर्यटन या फेसबुक पेज(ग्रुप) वरून फेसबुक युजर रवि फलटनकर इतीहास सांगण्याचा प्रयत्न करत आहे परंतु, रवि फलटनकर नावाच्या व्यक्तीने बल्लारशाह शहराचे संस्थापक तथा चांदा गोंडराज्याचे गोंड राजे बल्लाळशाह राजे आत्राम यांचा एकेरी उल्लेख आपल्या पोस्ट द्वारे करीत आहे.
वारंवार राजेंचा ऐकेरी उल्लेख करुन अपमानीत करीत आहे, "विदर्भ पर्यटन" फेसबुक युजर रवी फलटनकर यांनी बल्लारशाह नगरीचे संस्थापक गोंडराजे बल्लाळशाह राजे आत्राम यांचा ऐकेरी उल्लेख केला व नंतर त्याच पोस्ट वर विदर्भवाद्यांनी विरोध देखील केला,
खांडक्या बल्लाळशाह राजे आत्राम व आता हिरशाहराजे आत्राम यांचा एकेरी उल्लेख करून त्यांना अपमानीत करण्याचा प्रयत्न रवि फलटनकर करतांना दिसत आहे. विदर्भ राज्य आंदोलन समिती युवा आघाडी बल्लारशाह चे तालुका अध्यक्ष पराग गुंडेवार यांनी कमेंट करून विरोध दर्शविला होता व चेतावनी हि दिली होती, पण त्या नंतर ही, हिरशाहराजे आत्राम यांचा ऐकेरी उल्लेख करणे कुठं ना कुठं मनाला वेदना देणारा आहे, असे कृत्य खपवुन घेतले जाणार नाही,आमची व आदीवासी समाजाची भावना दुख:वली गेली आहे.
सदर फेसबुक युझर नामें रवी फलटनकर वर लवकरात लवकर भारतीय दंड संहिता, 1860 नुसार कलम 295A व अन्य विवीध कलमानच्या अंतर्गत गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी. या साठी विदर्भ राज्य आंदोलन समिती ने बल्लारशाह पोलीस निरीक्षक उमेश पाटिल यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करून लेखी तक्रार करण्यात आली आहे, या वेळी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे तालुका अध्यक्ष पराग गुंडेवार, तालुका सचिव गौतम कांबळे, शहर अध्यक्ष रोहित लोनारे, शहर संघटक अविनाश गायकवाड,शहर सचिव संदीप केशकर, सागर येरगुल्लावार, सह आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
