Top News

संभाजी ब्रिगेड, बल्लारशाह तर्फे शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा.

 संभाजी ब्रिगेड, बल्लारशाह तर्फे शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा.
            



(विदर्भ माझा न्युज 24 - उपसंपादक)गौतम कांबळे,बल्लारशाह,जि.चांदा :-  भारतभाग्यविधाता छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९१वी जयंती जगात सर्वत्र साजरी होत असताना बल्लारपूरातही शिवजन्मोत्सवाचा उत्साह प्रचंड होता. बल्लारपूरात शिवजन्मोत्सव धुमधडाक्यात साजरा करण्याची संभाजी ब्रिगेड ची परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून राहीलेली आहे .यावर्षीही त्याच उत्साहात संभाजी ब्रिगेड ने शिवजन्मोत्सव साजरा केला. शासनाने शिवजन्मोत्सवावर अनेक निर्बंध घातले असतांनाही उत्साह मात्र तेवढाच होता. सर्व प्रकारचे नियम पाळून या शिवजन्मोत्सवाची आखणी करण्यात आली होती.

         सकाळी बस स्टाॅपसमोरील हाॅटेल दरबारजवळ छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य तैलचित्र उभारले. याठिकाणी नागरिकांनी फुले वाहिली, लोकं याठिकाणी सेल्फी घेत उत्साहात शिवजन्मोत्सव साजरा करीत होते. संध्याकाळी ५ वाजता नगर परिषद येथील शिवस्मारक येथे सांस्कृतीक पद्धतीने ढोल-ताषांच्या गजरात मोठ्या उत्साहात मानवंदना अर्पण करण्यात आली. यावेळी "जय जिजाऊ-जय शिवराय", "हर हर महादेव"च्या घोषणांनी सर्व परिसर व्यापला.

            सदर शिवजन्मोत्सव नियमांअंर्तगत साजरा करण्यास प्रचंड तारेवरची कसरत झाली. हे सर्व यशस्वीपणे पार पाडण्यासाठी रोहित चुटे, संकेत चौधरी, अंकुश पिंपळकर, प्रतिक वाटेकर, गणेश मसराम, शुभम ठाकरे, निलेश सुर, कुणाल पटले, पवन राजगडे, कुणाल क्षीरसागर, निखिल वडस्कर, अक्षय चौधरी, चेतन मुळे, भुषण पेटकर, प्रणय वाटेकर, सौरभ उरकुंडे, मोहित आदमने, इसाख  इब्राहिम, राधाताई वडस्कर यासांरख्या अनेक मावळ्यांनी कष्ट घेतले.

Previous Post Next Post