मुल तालुक्यात 45 वर्षात प्रथमच शिवसेनेचा झेंडा.
(विदर्भ माझा न्युज 24 - तालुका प्रतिनीधी)संदीप तेलंग, मुल,जि.चांदा :- मुल तालुक्यातील राजकीय महत्वाकांक्षी असलेल्या व जनतेच्या नजरा लागुन राहिलेली व भाजपाच्या ताब्यात असलेली सुशी व नांदगाव ग्रामपंचायतीवर पहिल्यांदाच जिल्हाप्रमुख संदिपभाऊ गिर्हे तथा तालुकाप्रमुख नितीन येरोजवार यांच्या नेतृत्वात ग्रामपंचायत निवडणुक लढली गेली. या निवडणुकीत 45 वर्षात मुल तालुक्यात प्रथमच सुशी ग्रामपंचायत सरपंच पदि अनिल सोनुले व उपसरपंच पदि पाटिल वाळके यांची निवड झाली तसेच नांदगाव ग्रामपंचायत येथे शिवसेनेचे सागर देऊरवार यांची उपसरपंच पदि निवड करण्यात आली.
आज जिल्हाप्रमुख संदिपभाऊ गिर्हे व तालुकाप्रमुख नितीन येरोजवार यांनी सदस्याचे स्वागत केले.

