Top News

गोरेवाडा प्राणी संग्रहालयाला बाळासाहेबांचे नाव देण्यास विदर्भवाद्यांचा तिव्र विरोध.

 गोरेवाडा प्राणी संग्रहालयाला बाळासाहेबांचे नाव देण्यास विदर्भवाद्यांचा तिव्र विरोध.


विरांआस युवा आघाडी शहर बल्लारशाह तर्फे ग्रुहमंत्री अनील देशमुख यांच्या मार्फत मुख्यमंत्री व पर्यावरण मंत्रांना निवेदण.


(विदर्भ माझा न्युज 24 - उपसंपादक)गौतम कांबळे,बल्लारशाह, जि.चांदा :- दि.२२/०१/२०२१ रोजी विदर्भ राज्य आंदोलन‌ समीती युवा आघाडी शहर बल्लारशाह च्या वतीने महावीकास आघाडी  सरकारचा निषेध करत महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिलजी देशमुख हे शुक्रवारी दी.२२/०१/२०२१ रोजी खांडक्या बल्लाळशाह राजे यांनी स्थापन केलेल्या एतीहासीक बल्लारशाह नगरी इथे राष्ट्रवादी काॅग्रेस पक्ष कार्यकर्ता मेळाव्यात गृहमंत्री अनिलजी आले असता त्यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व पर्यावरण, पर्यटक मंत्री आदीत्यजी ठाकरे यांना निवेदण देण्यात आले, महाराष्ट्र सरकार ने नवा जिआर काठला आहे त्यात विदर्भातील राजधानी नागपुर मध्ये असलेल्या गोडेवाडा उद्यानाला स्व.बाळासाहेबांचे नाव देण्याचा निर्णय महावीकास आघाडी सरकार ने घेतला आहे.याच निषेध आज विदर्भ राज्य आंदोलन समिती युवा आघाडी बल्लारशाह तर्फे  करण्यात आले.

विदर्भाचा स्वतंत्र इतिहास आहे, विदर्भ हा गोंडराज्यांचा अधीपत्या खाली‌ होता, गोंड राजे भक्त बुलंदशाहराजे यांनि १७०२ मध्ये नागपुर नगरीची  स्थापना केली देवगढ़ वरुण नागपूर ला येउन भक्त बुलंदशाहराजे प्रथम यांनी शेजारील १२ गावे मिळवुन नागपुर ची स्थापना केली, आनी भक्त बुलंदशाहराजे यांचा कारकीर्दीत आदीवासी महीला सितागोंडीन या महीलेने  हा गोरेवाडा तलाव व अभयारण्य स्वता विकसीत केले होते. म्हनुण याला गोडेवाडा नाव पडले, आनी सरकार मात्र आता या एतीहासीक वास्तुनचे नाव बदलवुन मा.मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी यांच्या वडीलांचे नाव देने कीतपत योग्य आहे.

मा.स्व.बाळा साहेब आणि विदर्भ या दोन्ही परस्पर विरोधी गोष्टी आहेत मग विदर्भातील गोंड राज्यांचा इतीहास पुसण्याच काम महाराष्ट्र सरकार ने सुरु केले का? चांदा जिल्हात(चंद्रपुर) वरोरानाका उडान पुलाला स्व.बाळासाहेबांचे नाव देण्यात आले चांदा शहर हे खांडक्या बल्लारशाह राजे आत्राम,हिरशाह राजे आत्राम,बिरशाहराजे आत्राम,हीराईराणी आत्राम अश्या एकुन १९ विर योद्धे या चांदा भुमीला लाभले यांचे नाव आपन उडान  पुलाला देण्या एवजी आपन बाळासाहेबांचे नाव दिले .मात्र आता आपन परत नागपूर येथील गोडेवाडा चे नामकरण करत आहात मात्र त्याला  आमचा तिव्र विरोध आहे, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे जे गोरेवाडा प्राणी संग्रहालय आहे. हे गोंडवानाचा भाग असल्यामुळे आणि तिथल्या गोंड समाजाची आदिवासी समाजाची मागणी असल्यामुळे या प्राणिसंग्रहालयाला गोंडवाना नाव देण्याच मान्य करण्यात आले होते. 

आमचा शिवसेनाप्रमुखांच्या नावास विरोध नाही, पण विवाद होईल, अशा ठिकाणी ते देऊ नये, प्रतापगडच नामकरण करुण स्व.बाळासाहेब ठाकरे किल्ले प्रताप गड केले तर शांत बसणार का? असा सवालच विदर्भ राज्य आंदोलन समिती बल्लारशाह ने उपस्थीत केला आहे,  गोंड साम्राजात अनेक योद्धे झालेत आपन विदर्भातील गोंड साम्राज्याचा इतीहास वाचावा व योग्य निर्णय घेत गोडेवाडा उद्यानाचे नामकरण गोंड राजे भक्त बुलंदशाहराजे उद्यान करण्यात यावे. अशी मागनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व पर्यावरण/ पर्यटक मंत्री आदीत्यजी ठाकरे यांना विदर्भ राज्य आंदोलन समिती युवा आघाडी बल्लारशाह, शहर अध्यक्ष रोहित लोनारे यांच्या नेतृत्वाखाली गृहमंत्री अनिलजी देशमुख यांच्या मार्फत निवेदण देण्यात आली. या वेळी शहर सचिव संदीप केशकर, शहर संघटक अविनाश गायकवाड सह असंख्य विदर्भवादी उपस्थीत होते.

Previous Post Next Post