विदर्भाची राजधानी नागपुरात 4 जानेवारी २०२१ ला उर्जा मंत्री नितिन राउत यांच्या घराला घेराव घालतील विदर्भवादी.
जेष्ट विदर्भवादी नेते वामनराव चटप आंदोलनाच्या प्रचारार्थ मैदानात,बल्लारशाह शहरात विद्यार्थी,व्यापारी व जनतेच्या प्रत्यक्ष भेटी व आंदोलनाच्या माहीतीचे पत्रक वाटप.
४ जानेवारी रोजी नागपुर मध्ये होणार्या चलो नागपुर विद्युत मंत्री डाॅ. नितिन राऊत यांच्या घर घेराव आंदोलनाच्या प्रचारार्थ चटप साहेब यांनी बल्लारशाह शहरात विदर्भ राज्य आंदोलन समिती युवा आघाडी तालुका व शहर बल्लारशाह च्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या सोबत जनजागृती करण्यास सुरुवात केली. प्रथमतः सायंकाळी ४:०० वाजता वामनराव चटप साहेबांचे विदर्भ राज्य आंदोलन समीती बल्लारशाह तालुका जनसंपर्क कार्यालयात आगमन झाले या नंतर वामनराव चटप साहेबांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले व नंतर वामनरावजी चटप हे बल्लारशाह विराआंस चे तालुका अध्यक्ष पराग गुंडेवार आणि शहर अध्यक्ष रोहीत लोनारे यांचा सह पायदळ बल्लारशाह शहरात प्रचारार्थ निघाले.
गनपती वार्ड येथील विराआंस चे जनसंपर्क कार्यालया पासुन आंदोलनाच्या प्रचाराची सुरवात करण्यात आली तर बस स्टाॅप,न.प.चौक.,रेल्वे चौक होऊन वस्ती विभाग, असा संपुर्ण परीसर पिंजुन काळत एका एका व्यैक्ती ची प्रत्यक्ष भेट घेऊन आंदोलना बद्ल सुचना दील्या व पत्रक वाटप करण्यात आले. तर या वेळी विदर्भ राज्य आंदोलन समीती चे तालुका उपाध्यक्ष संजय घुगलोत,सचीव गौतम कांबळे,शहर सचीव संदीप केशकर,शहर संघटक अवीनाश गायकवाड,वस्ती विभाग अध्यक्ष राकेश बहुरीया,विभाग उपाध्यक्ष क्रूशाल बहुरीया,कोषाध्यक्ष प्रतीक माटे सह असंख्य विदर्भवादी कार्यकर्ते उपस्थीत होते.



