जनसेवेची खरी ओळख : अमन अंधेवार यांच्या वाढदिवसानिमित्त चंद्रपूरकरांसाठी अनोखा उपक्रम

जनसेवेची खरी ओळख : अमन अंधेवार यांच्या वाढदिवसानिमित्त चंद्रपूरकरांसाठी अनोखा उपक्रम


८ ऑगस्ट रोजी भव्य रक्तदान शिबिर व मोफत चुंबकीय बेल्ट वाटपाचे आयोजन


चंद्रपूर | उपसंपादक - गौतम कांबळे 8605011881 :: महाराष्ट्र नवनिर्माण सेना, चंद्रपूरच्या वतीने मनसे कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष  अमन अंधेवार यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत ८ ऑगस्ट २०२५, शुक्रवार रोजी भव्य रक्तदान शिबिर व मोफत चुंबकीय बेल्ट वाटप उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा उपक्रम खेडूळे कुनभी समाज सभागृह, अयप्पा मंदिर रोड, एस.टी. वर्क शॉप, तुकूम, चंद्रपूर येथे सकाळी १० वाजल्यापासून दुपारी ४ वाजेपर्यंत पार पडणार आहे. कार्यक्रमात नागरिकांना विविध प्रकारचे वैद्यकीय सहाय्यक साहित्य जसे की Cervical Collars, Shoulder Splints, Knee Splints, Ankle & Foot Splints, Wrist & Forearm Splints, Spinal Splints, Fracture Braces इत्यादींचे मोफत वितरण करण्यात येणार आहे.

रक्तदान शिबिरामध्ये जिल्ह्यातील सर्व नागरीकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मनसे कामगार सेनेच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच, या उपक्रमाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना आणि अपंग व्यक्तींना दिलासा मिळणार आहे.

राज ठाकरे नेतृत्वाखालील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सामाजिक दायित्वाची ही सशक्त भूमिका असून, चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेसाठी हा उपक्रम प्रेरणादायी ठरणार आहे.