ट्विंकल इंग्लिश स्कूल, नागभीड येथे मासिक पाळी आरोग्य कार्यशाळा संपन्न

ट्विंकल इंग्लिश स्कूल, नागभीड येथे मासिक पाळी आरोग्य कार्यशाळा संपन्न...

           

आरोग्य जागरूकतेसाठी आपला दवाखान्याचा उपक्रम – मासिक पाळीवर मार्गदर्शन



नागभीड : श्रीमती रामप्यारी देवी आसारामजी काबरा ट्विंकल इंग्लिश स्कूल, नागभीड येथे  तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विनोद मडावी यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, नागभीड यांच्या वतीने मासिक पाळी आरोग्य कार्यशाळा आयोजित करण्यात आली. 


या कार्यशाळेत आपला दवाखान्याच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियांका धाईत यांनी विद्यार्थिनींना मासिक पाळी दरम्यान घ्यावयाची काळजी, स्वच्छता आणि आरोग्यदायी सवयींबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच स्टाफ नर्स हर्ष ताराम यांनीही मुलींना आवश्यक माहिती दिली.

यावेळी वसतिगृहातील विद्यार्थिनींना मासिक पाळीमध्ये स्वच्छता राखण्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.



कार्यक्रमाच्या वेळी ट्विंकल इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या शुभांगी पोहेकर, मुख्याध्यापिका संगीता नारनवरे, तसेच रेणुका चौधरी (नर्स केअर टेकर), रीना भोयर (नर्स केअर टेकर) उपस्थित होत्या. याशिवाय आपला दवाखान्याची संपूर्ण टीम, नर्सिंग स्टाफ व विभागातील आशा वर्कर्स हजर होत्या.

 या उपक्रमातून मुलींमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करण्यात यश आले.