१२५ रुग्णांची मोफत डोळे तपासणी : ६० रुग्ण शस्त्रक्रियेसाठी निवडले.

१२५ रुग्णांची मोफत डोळे तपासणी : ६० रुग्ण शस्त्रक्रियेसाठी निवडले. 



कोरपना | रोशन आस्वले (ता.प्र) :  कोरपना तालुक्यातील खिर्डी येथे गणेशोत्सवानिमित्त दि. २९ ऑगस्ट २०२५ रोजी शुक्रवारी मोफत डोळे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. आदिलाबाद येथील प्रसिद्ध एल. व्ही. प्रसाद आय इन्स्टिट्यूट तर्फे घेण्यात आलेल्या या शिबिरात तब्बल १२५ रुग्णांची तपासणी करण्यात आली. यापैकी ६० रुग्णांची शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली आहे.

      सदर शिबिराला राजुरा येथील माजी नगराध्यक्ष अरुणभाऊ धोटे यांनी प्रमुख उपस्थिती लावून मार्गदर्शन केले. त्यांच्या उपस्थितीने रुग्ण व नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

      यावेळी खिर्डी ग्रामपंचायतीचे उपसरपंच दिपक खेकारे, रविंद्र मुके, वासुदेव पेंदोर, मारोती शेरकी आदी मान्यवर उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी रोशन आस्वले यांनी परिश्रम घेतले तर अरविंद बावणे, वासुदेव पिंपरे, जयपाल लाटकर यांनी मोलाचे सहकार्य केले. या शिबिरामुळे परिसरातील शेकडो रुग्णांना नेत्रतपासणी व शस्त्रक्रियेची सुविधा मिळणार असून नागरिकांनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत केले.