चंद्रपूर जिल्ह्यात मनसेचा वाढता प्रभाव – चोरगावात मोठा पक्षप्रवेश
राज ठाकरे यांच्या विचारांवर विश्वास, अमन अंधेवारांच्या कामगिरीतून प्रेरणा
चंद्रपूर | गौतम कंबळे उपसंपादक - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कामगार जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांच्या नेतृत्वाखाली चंद्रपूर तालुक्यातील चोरगाव येथे मोठा पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात गावातील काही युवकांसह माजी महिला सरपंच सुलोचना कोकाडे यांनी मनसेत प्रवेश केला.
मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश वासलवार, जनहित कक्ष जिल्हाध्यक्ष रमेश काळबांधे, रोजगार स्वयंरोजगार जिल्हाध्यक्ष मनोज तांबेकर, सुनील गुढे आदी पदाधिकारी या प्रसंगी उपस्थित होते.
जंगल परिसरातील चोरगाव हे गाव लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे विकासापासून वंचित असल्याचे सांगण्यात आले. गावातील समस्यांवर तोडगा काढण्यासाठी व राज ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ग्रामस्थांनी मनसेत प्रवेश केला.
प्रतीक चिकाटे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमात मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. “जनतेच्या कोणत्याही प्रश्नांवर व समस्यांवर मनसे नेहमी सोबत उभी राहील,” असा विश्वास या वेळी देण्यात आला.
या कार्यक्रमाला राजू लांडगे, वर्षा बोंबले, राकेश जवादे, अमन तुळ, विशाल भसारकर यांचीही उपस्थिती होती.