Historic victory under the leadership of MLA Kirtikumar (Bunty) Bhangadia!

आमदार  कीर्तिकुमार (बंटी) भांगडिया यांच्या नेतृत्वात ऐतिहासिक विजय!


नागभीड खरेदी-विक्री सहकारी सोसायटीवर भाजपचा झेंडा फडकला



नागभीड : नागभीड खरेदी-विक्री सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपाने मोठा विजय मिळवित पहिल्यांदाच सत्ता काबीज केली. आमदार बंटीभाऊ भांगडिया यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप व मित्रपक्षांचे सर्व ११ उमेदवार विजयी ठरले असून, ही एक ऐतिहासिक कामगिरी मानली जात आहे.

'ब' वर्ग वैयक्तिक प्रतिनिधी गटातून भाजप व मित्रपक्षांचे संजय होमराज गजपुरे, दिगंबर दादाजी गुरुपुडे, डोनू धनुजी पाकमोडे आणि रमेश पांडुरंग बोरकर विजयी झाले, तर ओबीसी गटातून संजू कृष्णाजी उरकुडे यांनी बाजी मारली.

याआधीच विविध गटांतून अविरोध निवड झालेल्या सदस्यांमध्ये 


रविंद्र आंबोरकर, आनंद कोरे (सोसायटी गट),
राहुल विश्वनाथ सवाईकर (अनु. जाती-जमाती गट),
चंद्रशेखर श्रीधर विगम (भटके विमुक्त गट),
श्रीमती मालाताई शांताराम देशमुख व सौ. वीणा अतुल चिल्लुरे (महिला राखीव) यांचा समावेश आहे.

तालुक्यातील शेतकऱ्यांची अत्यंत महत्त्वाची संस्था समजल्या जाणाऱ्या या सोसायटीच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून होते. भाजपने प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात उतरून विजयी झेंडा फडकावला आहे.

या दणदणीत विजयाच्या पार्श्वभूमीवर आमदार कीर्तिकुमार (बंटी) भांगडिया यांच्या प्रमुख उपस्थितीत नागभीड येथील भाजपा कार्यालयात नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार सोहळा पार पडला.
संस्थेचे सभासद व शेतकरी वर्ग नव्या संचालक मंडळाकडून सोसायटीला या पूर्वीचे वैभव प्राप्त करून देण्याची अपेक्षा व्यक्त करीत आहेत.