भारतीय जनता पार्टी कोरपना तालुक्याच्या वतीने पंडित दिनदयाल उपाध्याय जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
विदर्भ माझा न्युज 24 - कोरपना ग्रामीन प्रतिनिधी, नितेश केराम 8698423828
भाजपा कोरपना तालुक्याच्या वतीने पंडित दिनदयाल उपाध्याय जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्ष नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना, जिल्हा उपाध्यक्ष तथा संजयगांधी निराधार योजना अध्यक्ष प्रमुख उपस्थिती जगदीश पीपंळकर शक्ती केंद्र प्रमुख,संभाजी पेचे, बंडुजी भोयर, मनोहर बावणे तंटामुक्त अध्यक्ष,सुधाकर पेचे, मनोज गोरे दैनिक वार्ताहर राजु पा चिकटे राजु येरेकर बुथ प्रमुख,अशोक भोंगळे, विजय दुर्वे,संजय वाबीटकर,श्रीकांत दुर्वे आदी पदाधिकारी उपस्थित होते तालुका अध्यक्ष नारायण हिवरकर यांनी पंडित दिनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्या अर्पण केले तसेच इतर मान्यवरांनी पुष्प वाहून पूजन केले नारायण हिवरकर यांनी पंडित दिनदयाल उपाध्याय यांच्या जीवनावर प्रकाश टाकत त्यांचा जन्म 25 सप्टेंबर 1916 रोजी एका सर्वसामान्य कुटुंबात जन्म झाला ते तीन वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले त्यांचे शिक्षण आजोबा कडे झाले त्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम केले आणि ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष झाले परंतु फक्त 43 दिवसच अध्यक्ष राहिले 11फरवरी 1968 रोजी मोगल सराय रेल्वे स्टेशन वर त्यांची हत्या करण्यात आली त्यांच्या हत्येमुळे संपुर्ण देश शोकसागरात बुडाला देशाने एक चांगला राष्ट्रीय स्वयंसेवक गमावला अशा भावना व्यक्त केल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुगलसराय रेल्वे स्टेशनचे नाव बदलून पंडित दिनदयाल उपाध्याय रेल्वे स्टेशन हे नाव ठेवले. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे खुप खुप आभार मानले तसेच इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाला भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन राजु येरेकर यांनी केले तर आभार विजय दुर्वे यांनी मानले.
