Top News

Election of Sanjay Jadhav as Taluka President.

 संजय जाधव यांची तालुका अध्यक्ष पदी निवड।

 


  विदर्भ माझा न्युज 24 - कोरपना 


   महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी अंतर्गत विमुक्त जाती व भटक्या जमाती च्या कोरपना तालुका अध्यक्ष पदी  संजय जाधव यांची निवड करण्यात आली आहे.

 संजय जाधव हे पिपर्डा ग्राम पंचायत चे मा.ऊपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य पदावर कार्यरत आहे, त्यांनी अनेकदा पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी अनेक उपक्रम राबुन वरीष्ठ नेत्यांनवर आपल्या कामाची छाप टाकली आहे

 राष्ट्रवादीचे नेते  सय्यद आबीद अली जी यांच्या पॅनलचा दारुण पराभव करुण ग्रामपंचायत पिपर्डावर आपले वर्चस्व निर्माण केले आहे.

राजुरा विधानसभेचे आमदार तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष  सुभाष धोटे यांचे विश्वासू म्हणून त्यांच्या कडे काँग्रेस पक्षातील पदाधिकारी तथा कार्यकर्तांचा जमाव असतो,

 एकनिष्ठेने पक्षाचे काम करुण पोटात तेच आणी ओटात तेच, या वाक्य रचनेने ते पक्षात ओळखले जातात म्हणुन सुभाष  धोटे यांच्या मर्जीतले ते एक पदाधिकारी आहेत.

सुभाष धोटे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विकासात्मक कामे पिपर्डा गावी आणुन सुजलाम सुफलाम करण्याचा त्यांचा माणस आहे

कोरपना तालुक्यातील काँग्रेसचे नेते CDCC बँकेचे संचालक  विजयराव बावने, तालुका अध्यक्ष उत्तमराव पेचे, माजी जिल्हा परिषद सदस्य सिताराम कोडापे,क्रुषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक चव्हाण,मा.प.स.उपसभापती  संबा कोवे, यांच्या मार्गदर्शनाखाली ते कोरपना तालुक्यात काँग्रेस पक्षाची विचारधारा पोहचविण्याचे काम करत आहे , म्हणून पक्षांनी कोणत्याही प्रकारचे राजकीय वारसा नसताना  संजय जाधव यांची कोरपना तालुका विभुक्त जाती जमातीच्या तालुका अध्यक्ष पदी निवड करुन त्यांना त्यांच्या कार्याची पावती दिली आहे.

प्रदेशाध्यक्ष  नाना पटोले, विरोधी पक्षनेते  विजय वडेट्टीवार, आमदार  सुभाष धोटे व विमुक्त जाती व भटक्या जमाती विभागाचे प्रदेश अध्यक्ष ऍड. पल्लवी रेनके यांचे नेतृत्वात काम करून पक्षाचे कार्य जनतेपर्यंत पोहचवाल ही अपेक्षा. पक्षांने त्यांच्या कडुण केली आहे 

त्यांच्या निवडीबद्दल कोरपना तालुक्यातील जनता आनंद उत्साह करूण व अभिनंदन व पुढील कार्यास त्यांना शुभेच्छा! देत आहे.


    

Previous Post Next Post