Top News

One Day Taekwondo Training Camp Concluded at Savitribai Semi English School, Babupeth....

एक दिवशीय तायक्वांदो प्रशिक्षण शिबिर सावित्रीबाई सेमी इंग्लिश शाळा, बाबूपेठ येथे संपन्न....


 विदर्भ माझा न्युज 24 - चांदागड (चंद्रपूर) 



तायक्वांदो असोसिएशन ऑफ चंद्रपुर डिस्ट्रिक्ट आणि मार्शल आर्ट व स्कूल गेम असोसिएशन च्या संयोगाने तायक्वांदो जिल्हा महासचिव व महाराष्ट्र बॉडी चे कार्यकारी सदस्य  सतीश खेमस्कर  यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपुर येथील शालेय विद्यार्थी यांना तायक्वांदो या शालेय खेळाचे प्रशिक्षण देण्यात आले,


यात विद्यार्थी यांना या खेळातील महत्व ,फायदे , शासकीय योजना व फाईटिंग चे प्रशिक्षण देण्यात आले ,यात सहकारी म्हणून परीक्षक  तुषार दुर्गे,  अश्विन सिधमशेट्टीवार,आदर्श कापरकर, शुभम केडझरकर, सौरभ रामटेके, अनुष्का काळे, रोशनी छतारे, सुहानी शिरपूरकर यांचे सहकार्य घेऊन विध्यार्थ्यांना योग्य प्रशिक्षण दिले.

या शिबिराच्या यशस्वी होण्याकरिता मास्टर निर्धार आसुटकर, मास्टर श्रावण शेट्टी, मास्टर नवनीत मून, रितेश पाथरडे,व बाबूपेठ येथील शाखेचे प्रशिक्षक मास्टर जितेंद्र डोनेवार, डॉ .बाबासाहेब आंबेडकर कॉलेज शाखा ची लेडी प्रशिक्षक कु.अंजना शेट्टी यांनी परिश्रम घेतले.

Previous Post Next Post