Top News

Visible support of Vidarbha State Movement Committee for Nagbhid District Construction Action Committee - Parag Gundewar

नागभीड जिल्हा निर्मीती कृती समीतीला नागभीड जिल्हा निर्मीती करीता विदर्भ राज्य आंदोलन समिती चा जाहिर पाठींबा - पराग गुंडेवार 



 विदर्भ माझा न्युज 24 - नागभीड 

चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्याला जिल्हा घोषित करण्यात यावे यासाठी नागभीडकर अनेक वर्षांपासून मागणी करीत आहेत. मात्र राज्य शासनाने सदर मागणीकडे कानाडोळा केल्याने शासनाला जाग आणण्याकरीता नागभीड जिल्हा निर्माण कृती समीतीच्या वतीने पुनच्छ मशाल पेटवल्या गेली असुन दि. १० जुलै २०२३ रोजी आयोजित आंदोलनास विदर्भ राज्य आंदोलन‌ समातीच्या वतीने जाहीर पाठिंबा दर्शविला आहे.

याबाबत विदर्भ राज्य आंदोलन समातीचे पराग गुंडेवार यांनी एक पत्र जाहीर करीत पाढींबा जाहीर केला आहे. नागभीड हे ठिकाण चंद्रपूर जिल्हा मुख्यालयापासुन सुमारे १०७ किमी अंतरावर असुन नागरिकांना जिल्हा मुख्यालयी विविध शासकीय कामांसाठी, जिल्हा न्यायालय अंतर्गत वाद, शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी सतत होणाऱ्या पायपीटीमुळे लांब पल्ल्याच्या प्रवासातुन प्रचंड नाहक त्रास सहन करावा लागतो. वारंवार प्रवासामुळे जनसामान्य नागरिकांना आर्थिक फटका सुध्दा सहन करावा लागतो. नागरिकांची सतत होनारे त्रास थांबवीन्या साठी नागभीड जिल्हा निर्माण कृती समितीने आपल्या वारंवार रास्त मागणीतुन शासनस्तरावर सलग पाठपुरावा करीत नागभीड जिल्हा निर्मीतीसाठी आग्रही मागणी धरली आहे. 

मात्र राज्य सरकार कडुण कुठलीच हालचाल न झाल्याने नागभीड जिल्हा निर्माण कृती समितीने रास्त मागणीकडे कानाडोळा करणाऱ्या राज्यशासनाला जाग आणण्या हेतु पुनच्छ एकदा नागभीड जिल्हा निर्माण कृती समीतीच्या वतीने उद्या १० जूलै २०२३ ला आंदोलन करण्यात येणार आहे. यासंदर्भात बल्हारशास तालुका अध्य‌क्ष पराग गुंडेवार यांनी विदर्भ राज्य आंदोलन समीती मध्ये चर्चा करून समीतीचा पाठींबा जाहीर केला आहे.

Previous Post Next Post