Top News

There was a sensation in the police force..... SRPF jawan was killed by a fellow jawan......

पोलीस दलात उडाली एकच खळबळ.....SRPF जवानाची सहकारी जवाना कडुण हत्या......



 विदर्भ माझा न्युज 24 -  गडचिरोली 

आपसी वादातून राज्य राखीव दलाच्या एका जवानांनी सोबत असणाऱ्या जवानांची  हत्या केल्याची धक्कादायक घटना गडचिरोली  जिल्ह्यातील देसाईगंज वडसा येथे दि. 3 जुलै 2023 च्या रात्री तालुका मुख्यालयाच्या कॅम्पमध्ये  घडली आहे. 

सुरेश मोतीलाल राठोड असे मृतक जवानाचे नाव आहे. तर मारुती सातपुते असे आरोपी जवानाचे  नाव आहे. या प्रकरणीत देसाईगंज पोलीस ठाण्यात जवानाच्या हत्येची नोंद करण्यात आली. याप्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या घटनेमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. 

सुरेश राठोड आणि मारुती सातपुते हे दोघेही राज्य राखीव पोलीस दलाच्या ( SRPF ) वडसा तालुका मुख्यालयात तैनात होते. या दोघांमध्ये काल रात्री 10.30 ते 10.45 दरम्यान काही कारणास्तव आपसी वाद झाला. हा वाद येवढ्या विकोपाला गेला की जवान सातपुतेने सोबती जवान सुरेश राठोड वर थेट धारदार शस्त्राने छातीवर वार केला. 

जख्मीला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र  या प्राणघाती हल्ल्यामुळे उपचारादरम्यान सुरेश राठोड चा मृत्यू  झाला. सदर प्रकरणाची चौकशी राज्य राखीव पोलीस दलाचे अधिकारी आणि गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक  करीत आहेत. देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राठोड चे पार्थिव शरीर कुटुंबाकडे सोपवण्यात आले आहे. दरम्यान, दोघा जवानांमध्ये नेमका कोणत्या कारणातून वाद झाला, याबाबत अद्याप कळू शकले नाही. या प्रकरणाचा  सखोल तपास सुरु आहे.

Previous Post Next Post