उभ्या असलेल्या कंटेनरची काच व दार फोडून, बॅटरी व डिझेल लंपास करनार्या चोरट्यांच्या काही तासातच पोलीसांनी आवळल्या मुसक्या......
विदर्भ माझा न्युज 24 - सावळी सदोबा
पारवा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या सावळी सदोबा लगत असलेल्या दातोडी या गावांमध्ये MH-34-Y-2532 या क्रमांकाचा कंटेनर दातोडी या गावामध्ये उभा असताना,रात्रीच्या दरम्यान चोरट्याकडून कंटेनरचे समोरचे काच फोडून तर एका साईडचा दार तोडून कंटेनरमध्ये प्रवेश केला, चोरट्यानी एक्सीट कंपनीची बॅटरी किंमत अंदाजे १६,००० व डिझेल १५० लिटर किंमत अंदाजे १४,०००रुपये अंदाजे ३०,००० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केले, या संदर्भात मशीन ऑपरेटर प्रमोद रमेश राठोड यांनी दिनांक १/७/२०२३ रोजी सावळी सदोबा पोलीस चौकीला तक्रार दिली होती, सदर मालकाजवळ जेसीपी मशीन असल्याने,जेसीपी मशीन ने-आण करण्यासाठी कंटेनर वापरण्यात येते, दातोडी येथे जलजीवन मिशनचे काम चालू असल्याने, कंटेनर गावामध्ये उभा ठेवलेला होता, याच संधीचा फायदा चोरट्यांनी घेतला असावा, कंटेनर ऑपरेटरच्या तक्रारीवरून पारवा पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून, संशयित आरोपी हरी अरुण नागोसे वय २५ वर्ष राहणार दातोडी याला ताब्यात घेऊन, त्याची कसून चौकशी केली,पोलिसांच्या बाजीरावाने आरोपी हरीने सर्व कबुल केले व आरोपी हरीकडून सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आले, ही कारवाई पारवा पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रवीण लिंगाडे यांच्या मार्गदर्शनात,गणेश राठोड,हेमंत राठोड,राहुल वाघमारे यांनी पार पाडली.

