Top News

Swami Samarth devotees felicitated for the appointment of Brijbhushan Pazare as the President of Sanjay Gandhi Niradhar Yojana.

संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्षपदी ब्रिजभूषण पाझारे यांची नियुक्ती झाल्याबद्दल स्वामी समर्थ भक्तगण तर्फे सत्कार......

 


विदर्भ माझा न्युज 24 - चांदागड (चंद्रपूर)



चंद्रपूर महानगर मध्ये सुधीर मूनगंटीवार वने, सांस्कृतिक कार्यक्रम, मत्स व्यवसाय नियोजन मंत्री यांचा तर्फे संजय गांधी निराधार योजनेची समिती गठीत करण्यात आली, यामध्ये ब्रिजभूषण पाझारे यांनी समिती अध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. 

महानगरामध्ये संजय गांधी निराधार योजनेचा प्रत्येक गरजू वृद्ध, विधवा महिलाना लाभ मिळावा याकरिता समितीच्या पुढाकार असणार आहे. पाझारे यांची समितीच्या अध्यक्ष पदी नियुक्ती होताच चंद्रपूर महानगरात वार्ता झपाट्याने पसरली असून अनेकांमध्ये उत्साह दिसून येत आहे. चंद्रपूर महानगर येथील श्रद्धा नगर तुकूम  येथिल अखिल भारतीय स्वामी समर्थ बाल संस्कार सभागृह येथे स्वामी समर्थ भक्त गणांच्या वतीने ब्रिजभूषण पाझारे यांचा नियुक्ती  पदाचे  अभिनंदनपर सत्कार कार्यक्रम करण्यात आले. 

स्वामी समर्थयांचा भक्तीच्या श्रुखलेत जुडलेल्या सेवानिवृत्त, वृद्ध कलावंत, वृद्ध महिला व पुरुषांना शासनाच्या विविध योजनेबाबत पाझारे यांनी माहिती दिली. तसेच गरजू व्यक्तींना संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना व इतर शासनामार्फत राबविण्यात आलेल्या योजनेचा लाभ मिळावा याकरिता सदैव आमची समिती प्रयत्नशील राहील असे प्रतिपादन यावेळी पाझारे यांनी उपस्थिताना केले. यावेळी उपस्थित मान्यवर सुभाष कासनगोट्टूवार माजी नगरसेवक,  सुधाकर टिपले,संजु कोटावार, चैत्राम लासुंडे, शरद कसावर, प्रशांत जाधव, मनोज पिदुरकर, स्वप्निल बदकी, वनिता रौउत साधना लासुने, माया बुरडकर, मीरा पिदुरकर, रेखा पिसे, रेखा तालेवार, विद्या महाजन, प्रभावती सूरकर, रक्षा चौधरी, सुषमा वानखेडे व आदी उपस्थित होते.   

Previous Post Next Post