Top News

Many people joined the BJP, including the sub-sarpanch of Jamni-Bailampur-Pugadipathar Everyone should actively take initiative for the development of the village - District President Devrao Bhongle

जामणी-बैलमपुर-पुगडीपठार येथील उपसरपंचासह अनेकांचा भाजपात प्रवेश 


गावाच्या विकासासाठी सर्वांनी सक्रियतेने पुढाकार घ्या  - जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे


 विदर्भ माझा न्युज 24 - राजुरा 


राजुरा तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या मौजा जामणी-बैलमपुर-पुगडीपठार या ग्रामपंचायतीचे उपसरपंच अशोक चांदेकर यांच्या नेतृत्वात ग्रा. पं. सदस्यांबरोबर अनेकांनी दि.2 जुलईला भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. भाजपचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या घुग्घुस येथील जनसंपर्क कार्यालयात हा पक्षप्रवेश घेण्यात आला. 

यावेळी गडचांदूर भाजपचे महामंत्री हरी घोरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.यामध्ये महेश सुद्धाले, शिवाजी झोडे, भुजाबाई पेंदोर, कैलास जाधव, अविनाश नैताम, गणेश सुरजोशी, तुळशीदास कुळसंगे, भारत कामतवार, अजय जाधव, उमेश सुद्धाले, दिवाकर पेंदोर, निरंजन मडावी, कृष्णा गेडाम, सत्तू सिडाम, राहुल तारूडे, शंकर बिजे, सुषमा कुळसंगे, कविता सिडाम, प्रतिभा परचाके, ममताताई मंगाम, सुनिता मडावी, मंजुषा मेश्राम, गोपीका थोरात, शितल मडावी, पार्वताबाई भारती यांचा समावेश आहे. 

जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी सर्वांच्या गळ्यात पक्षाचे दुपट्टे टाकून भाजप परीवारात मनःपुर्वक स्वागत केले. तसेच येत्या काळात जामणी-बैलमपुर-पुगडीपठार या ग्रामपंचायतीच्या विकासासाठी सर्वांनी सक्रियतेने पुढाकार घ्या, गावातील समस्येच्या निराकरणासाठी पुढे या असे आवाहन करीत राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात आम्ही सर्व जामणी, बैलमपुर व पुगडीपठार या गावांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी तुमच्या सोबत आहोत. असा विश्वास त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला.

Previous Post Next Post