Top News

Stop the expansion of Durgapur Coal mine or else we will protest strongly.....Raju Zode warns....

दुर्गापूर कोळसा खाणीचे विस्तारीकरण थांबवा अन्यथा तीव्र आंदोलन करू.....राजू झोडे यांचा इशारा....



 विदर्भ माझा न्युज 24 - चांदागड (चंद्रपूर)  

दुर्गापूर कोळसा खाणीचे विस्तारीकरण थांबवा अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी केंद्र व राज्य सरकारला दिला आहे.चंद्रपूर शहरानजीक दुर्गापुर ओपन कास्ट कोळसा खान गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे.आधीच ह्या खाणीमुळे जल,जंगल आणि वाघाचा अधिवास कमी केला असून इथे वन्यजीव मानव संघर्ष सुरू आहे,ह्यातच भर म्हणून की काय आता केंद्र आणि राज्य सरकारने पुन्हा 121.58 हेक्टर जंगलाची जमीन कोळसा खाणीसाठी दिली आहे.ह्यामुळे परिसरात पर्यावरनाचे,जंगलाचे,वाघ आणि वन्यजीवांचे मोठे नुकसान होणार आहे.


सीनाळा खाणीच्या परिसरात किमान आठ ते दहा वाघ आणि असंख्य वन्यजीव आहेत.ह्या विस्तारिकरणार 121.58 हेक्टर जंगल कापल्या जाणार असून त्यात 13457 वृक्ष आणि 64349 बांबू कोळश्यासाठी तोडल्या जाणार आहेत.खाणीसाठी लागणाऱ्या बहुतेक मंजुरी वन विभागाने ,राज्य आणि केंद्र शासनाने दिल्या आहे. शासनाचे ग्रीन ऊर्जेचे धोरण असताना तसेच गरज नसताना कोळश्यासाठी जंगल,वाघ , वन्यजीव आणि ताडोबा चे जंगल देणे योग्य नाही.ह्या खाणी मुळे ताडोबा चे जंगल आणि वाघाचा भ्रमणमार्ग धोक्यात येत असून मानव व वन्यजीव संघर्ष वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळं सिनाळा येथे प्रस्तावित खाण क्षेत्राचे विस्तारीकरण केल्यास उलगुलान संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करू असा इशारा राजू झोडे यांनी दिला आहे.



Previous Post Next Post