शेतात काम करणाऱ्या महिलेवर झाड कोसळल्याने महीलेचा जागीच मृत्यू.....
विदर्भ माझा न्युज 24 - कोरपना (रोशन आस्वले - तालुका प्रतिनिधी 9823145848 )
सर्वत्र शेतीचा हंगाम सुरू झाला असल्याने सध्या शेतात काम सुरु आहे. आज कोरपना तालुक्यातील वडगाव येथील काही महीला शेतात कामा करीता गेले अस्ता अचानक पाऊसाला सुर्वात झाली त्यातच जोराचा वारा सुटला त्यात झाड कोसळ्याने महीलेचा मृत्यु झाला.
सवीस्तर वृत्त असे आहे की, शेतात काम करण्यासाठी गेलेल्या वडगाव येथील वर्षा अशोक उरकुडे (वय 36 वर्ष) या महिलेचा झाड कोसळून अंगावर पडल्याने जागीच मृत्यु झाला .
वडगाव येथील 4 महिला शेतात काम करीत असतांना अचानक पाऊस लागला व जोराचा वारा सुटला दरम्यान चारही महील झाडाच्या खाली बसल्या होत्या विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली अशातच झाड कोसळल्याने वर्षा अशोक उरकुडे (वय 36 वर्ष) या महिलेचा त्या झाडा खाली दबुन जागीच दुर्देवी मृत्यु झाला तर इतर महिला थोडक्यात बचावल्या वर्षा उरकुडे यांचा दुर्देवी मृत्यु मुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. वृत्त लिहे पर्यंत सदर घटनेची माहीती पोलिसांना दिली असुन पोलिस घटना स्थळी दाखल झाली असुन घटनेचा पंचनामा करीत आहे.
