सर्वोदय विद्यालय, बल्हारशाह ची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम.........
बल्हारशाह शहरातील सेमी इंग्रजी माध्यमातून प्रथम स्थानकावर सर्वोदय विद्याल.....
दहावीचा निकाल 95.23 %
विदर्भ माझा न्युज 24 - बल्हारशाह
नुकताच एस एस सी च्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला त्यात सेमी इंग्रजी मध्यमातुन शहरातुन पहील्या क्रमांकाचा मान सर्वोदय विद्यालय बल्हारशाह ने गाठुन उतक्रृष्ट निकाल दिला आहे. ज्यामध्ये मंथन अनिल आवळे याने 90.20% गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक पटकावीला, कु. चांदणी सुनील निमसटकर हिने 88.40% गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकावीला व रोहन नितेश कटकमवार याने 86.00% गुण मिळवून तिसरा क्रमांक पटकावीला आहे.
सर्वोदय विद्यालयातील एकूण 84 विद्यार्थ्यांनी 10 वी ची परीक्षा दिली त्यात सर्व विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. ज्यामध्ये प्राविण्य श्रेणीत 14, प्रथम श्रेणीत 29, द्वितीय श्रेणीत 27 आणि तृतीय श्रेणीत 10 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
यशस्वी व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे म. शि. प्र. मंडळाचे अध्यक्ष संजय कायरकर, शाळेचे मुख्याध्यापक षडानन पोडे, पर्यवेक्षक पंदीलवार, ज्येष्ठ शिक्षिका कु. गजभे, ज्येष्ठ शिक्षक वटाणे, राजेश मारपल्लीवार , वर्ग 10 वी चे वर्गशिक्षक सौ. बुटले व गाडगीलवार तसेच इतर शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटणालीस शुभेच्छा दिल्या. तर उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय शिक्षक व पालकांना दिले.




